गुजराती वाणी
- dileepbw
- Nov 8, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "गुजराती वाणी" समाजाची वैशिष्ट्ये
महाराष्ट्रातील "गुजराती वाणी" लोकांपैकी पोरवाड, श्रीमाळी व मोढ वाणी हे लोक श्रावक पंथाचे "जैन" धर्मीय तर बाकीचे गुजराती वाणी वैष्णव किंवा वल्ल्भाचारी पंथाचे "हिंदू" धर्मीय लोक आहेत.
गुजरात मधील डाकोर येथील "रणछोडदास" व द्वारकेचा "श्रीकृष्ण" ही त्यांची आराध्य दैवते आहेत.
महाराष्ट्रातील "गुजराती वाणी" लोकांच्या जात पंचायती त्यांचे जातीय निवाडे करत असत.
"गुजराती वाणी" लोकांच्या मुख्य प्रकारात "रोटी-बेटी" व्यवहार होत नाहीत. "गुजराती वाणी" लोकांच्या उपप्रकारात "रोटी व्यवहार" होतो, पण "बेटी व्यवहार" होत नाहीत.
बहुतेक "गुजराती वाणी" घरी गुजराती व बाहेर इतकी शुद्ध मराठी बोलतात की जणू काही ते मराठी ब्राह्मणच आहेत.
नीट-नेटके व टापटिपीने रहाणारे "गुजराती वाणी" स्वभावाने अत्यंत मवाळ,मृदू व कष्टाळू असतात. दुकानदारी,छोटा मोठा व्यापार,सावकारी हा त्यांचा व्यवसाय असतो.
"गुजराती वाणी" मुलींचे विवाह लवकर केले जातात तर गुजराती वाणी मुलांचे विवाह उशिरा केले जातात. याचे कारण म्हणजे वरपित्याला खूप मोठी रक्कम वधूपित्याला आहेर म्हणून द्यावी लागते.
"गुजराती वाणी" लोकांमध्ये "विधवा विवाह" मान्य नाही.
आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत असलेल्या "गुजराती वाणी" जमातीचे पुरोहित गुजराती ब्राह्मण असतात व त्यांच्या घरी रोज देव्हारयामध्ये त्यांच्या देवांची पूजा केली जाते.
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments