top of page

जोगेश्वरी(जोगशेलू) माताजी - रक्तदान शिबिर

  • dileepbw
  • Sep 18, 2022
  • 1 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या सोळा कुलदेवतांपैकी एक "जोगेश्वरी(जोगशेलू) माताजी यांच्या भक्तगणांनी(श्री.मधुकर अमृतकर - ७७०९७८३०३०,९४२११५७७६५,सुयोग अमृतकर -९८५०७६६९७४, ८६२५०९६७१७) पौर्णिमेचे औचित्य साधून शुक्रवार,दिनांक १६/०९/२०१६ रोजी,सकाळी ८ ते दुपारी २ या वेळात सौरभ बिल्डिंग,वैभव मंगल कार्यालयाच्या मागे,भडगाव रोड, चाळीसगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

आजच्या विज्ञान युगात मानवाने विविध तंत्रज्ञान विकसित केले असूनही आज तागायत कोणत्याही प्रयोगशाळेत मानव रक्त तयार होऊ शकत नाही.रक्त फक्त मानवी शरीरातच तयार होते.

आजकाल वाढणारे विविध प्रकारचे आजार, अपघात, शस्त्रक्रिया त्यामुळे वाढणारी रुग्णसंख्या बघता रक्ताची मागणी खुप वाढली आहे.

त्या तुलनेत रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या पिशव्यांची कमतरता भासते.

त्यासाठी आपण सर्वांनी या शिबिरात तसेच नियमित रक्तदान करावे.ही नम्र विनंती.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ६७१०)

Recent Posts

See All
सारजा-बारजा माता

लाड सका(शाखीय) वाणी समाजातील सोळा कुलदेवतांपैकी एक "सारजा-बारजा माता" यांची श्री.गिरीष रामचंद्र वाणी,पारोळा या समाज बांधवाने संकलित...

 
 
 
राजस्थानमधील कुलदेवता

मध्य आशियातून राजस्थान-गुजरात मार्गे महाराष्ट्रात स्थलांतरीत झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या महाराष्ट्रातील सोळा कुलदेवतांची...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page