जीवा-शिवाचे मिलन
महाराष्ट्रातील "वैष्णव" पंथीय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाने विवाह संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपलासा केलेला "शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाज
"शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाजात "मृत्यू" ही अशुभ घटना न समजता "जीवा-शिवाचे मिलन" या अर्थाने शुभ घटना मानली जाते.
मृत व्यक्तीला अभ्यंग स्नान घालून,भस्माने व बेला-फुलाने सजवून,सारवलेल्या बैठकीवर, भिंतीला टेकवून बसविले जाते.मृत व्यक्तीचे "मस्तक" स्थिर रहावे म्हणून छतावरील खुंटीला टांगले जाते. चंदनादी धूपदीपन केले जाते.
त्यानंतर "बैठ्या" अवस्थेत मृत व्यक्तीला डोली किंवा झोळीतून,वाजत-गाजत,शंखनाद करीत, "हर हर शिव शिव" असा गजर करीत गावाबाहेरील "लिंगायत वाणी" समाजाच्या स्मशानभूमीत नेण्यात येते.
स्मशानभूमीत "बैठ्या" अवस्थेतच मृत व्यक्तीचे "दफन" केले जाते."वैष्णव" पंथीय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजात मात्र मृत व्यक्तीचे "दफन" न करता "दहन" केले जाते.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comments