माझे तीर्थरूप
- dileepbw
- Sep 7, 2022
- 1 min read
इ.स.१८५० मध्ये "इंग्रजी शिक्षणा" त फक्त "ब्राह्मण" व अन्य बुद्धिजीवी जातींमधील व्यक्तीच रस घेत होत्या.
अशा व्यक्ती अत्यंत हलाखीच्या परिस्थिती शिक्षण घेत असत.
शिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या अर्थ सहाय्यासाठी त्यांना शासनाच्या शिष्यवृत्तीवर अवलंबून राहावे लागत असे.
पारंपारिक व्यवसाय सोडलेला असल्यामुळे, शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही,त्यांना उपजीविकेसाठी सुद्धा शासनावरच अवलंबून राहावे लागत असे(संदर्भ:- सर अन्द्रू पेरी - मुंबई इलाख्याच्या बोर्ड ऑफ एज्यूकेशनचा इ.स.१८५० - १८५१ चा अहवाल).
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील अशी अनेक उदाहरणे अनेकांनी पहिली असतील.
माझे तीर्थरूप श्री.बाळकृष्ण महादेव वाणी(देव) यांनी त्यांच्या घरच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळेच, तत्कालीन ब्रिटीश शासनाच्या पाठींब्यावरच शिक्षण व त्यानंतरच्या काळात शासनाच्या पाठींब्यावरच अवलंबून असणारी "सरकारी नोकरी" ही उपजीविका अंगिकारली.
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचा "व्यापार" हा पारंपारिक व्यवसाय त्यांनी सोडलेला असल्यामुळे,त्यांनी "अध्ययन व अध्यापन" या क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली.
शालांत परीक्षेत "जगन्नाथ शंकरशेठ" हा "संस्कृत" विषयातील सन्मानाचा पुरस्कार पटकावीत त्यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालय,पुणे येथून पदवी परीक्षेत संपूर्ण पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला.
आजही सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरील गुणवत्ता यादीत त्यांचे नाव मोठ्या सन्मानाने झळकते आहे.




Comments