"देव" कुलाचा इतिहास
- dileepbw
- Sep 8, 2022
- 1 min read
हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलाचा इतिहास
हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" कुलाला समाज नियंत्रणाचे कार्य सुद्धा करावे लागत असे. लाचे आपल्या "देव" कुलामधील "कुलाचारा" ला अनुसरून समाज बांधवांचे वर्तन असले पाहिजे हा "देव" कुलाचा दंडक असे. "देव" कुल परंपरेनुसार असे वागण्याचे प्रत्येक व्यक्तींवर बंधन असे. "देव" कुलाची प्रतिष्ठा जपण्यासाठी कुल सदस्य प्रयत्नशील असत. "देव" कुल सदस्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी "कुल पंचायती" ची योजना असे. "देव" कुल परंपरा मोडणाऱ्यावर सामाजिक आरोप ठेवून "देव" कुलातून "बहिष्कृत" करण्याची शिक्षा केली जात असे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होताना वेळ प्रसंगी अन्य जातीच्या लोकांबरोबर सहभोजन केल्याबद्दल समजातून "बहिष्कृत" झाल्याचा इतिहास सापडतो.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments