top of page

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ११"

  • dileepbw
  • Aug 30, 2023
  • 1 min read

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ११"


हरीश सरोदेने पॅथॉलॉजी प्रॅक्टिस आणि रोजी रोटीच्या टेस्टस याबद्दल लिहीण्याची विनंती केल्याने "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती" ही लेखमाला लिहायला घेतली आहे. पहा भावते का ?

माझ्या पॅथॉलॉजी प्रॅक्टिसमधे पहिले "स्वयंचलित यांत्रिकीकरण" झाले ते "बायोकेमेस्ट्री" या विभागाचे."Folin Wu" या पध्दतीने BSL करणे हे इतके कटकटीचे,वेळखाऊ व किचकट काम होते की बाकीच्या कामांना वेळच मिळत नसे.मग सरळ "हार्पर" व "वार्ले" उघडला.परत त्याची पारायणे केली.तेव्हा "GOD-POD" ही सुलभ पध्दत सापडली.काम सुकर झाले.पण अन्य कामे वाढतच गेली.मग

संपूर्ण "बायोकेमेस्ट्री"चे "स्वयंचलित यांत्रिकीकरण" करण्याचा विचार मनात आला.ते कसे केले ते आता सांगतो.

मातृसंस्थेत "स्वयंचलित यांत्रिकीकरण" हा बदल घडायला अजून बर्‍याच वर्षांचा अवकाश होता.तर समस्त पुणे शहरात "बायोकेमेस्ट्री" चे "स्वयंचलित यांत्रिकीकरण" फक्त घारपुरे व गोडबोलेसरांकडे होते.ते होते Miles India या कंपनीचे ! त्याचा अभ्यास सुरू करताच MR मंडळींची अक्षरश: "टोळधाड" माझ्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरीत पडली.

जो तो "वधुपित्या" प्रमाणे आपल्या मुलीचे गुणगान करायचा. मग थेट "स्वयंवर" च रचले.लॅबोरेटरीचे कामकाज संपल्यावर काही समकालीन पॅथॉलॉजीस्टना व या सर्व "वधूपित्यांना" आमंत्रित केले. टेबलच्या एका बाजूला पॅथॉलॉजीस्ट(पी.के. शर्मा,सतीश कुलकर्णी,राजू राणे इ.)व समोर "वधूपिता" असा "मुलाखतींचा जाहीर कार्यक्रम" सुरू झाला.तो पहाटे दोन वाजता संपला.

हा "मुलाखतींचा जाहीर कार्यक्रम" पॅथॉलॉजी "इंडस्ट्री" मधे तसेत पॅथॉलॉजीस्ट मंडळींमधे इतका प्रसिध्द झाला की त्याची चर्चा गावोगावी होऊ लागली.सर्व उपकरणांचा इतका सखोल अभ्यास झाला की त्यावर एक चांगले "Subject Seminar" च झाले असते.पहाता पहाता त्याचा एक "स्लाईड शो" तयार झाला व गावोगावी व्याख्यानासाठी आमंत्रणे येण्यास सुरूवात झाली.

Recent Posts

See All
"शिष्यात इच्छेत पराजयम"

"शिष्यात इच्छेत पराजयम" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" गुरूवर्य कै.डाॅ.भीमसेन रायचूर यांना विनम्र अभिवादन करून त्यांची एक आठवण...

 
 
 
"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" माझ्या सर्व हयात व दिवंगत गुरूंना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

 
 
 
"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन"

"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन" ©दिलीप वाणी,पुणे आज ५ सप्टेंबर ! शिक्षकदिन ! द्रविडसरांनी स्मरण करून दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page