"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग १४अ"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग १४अ"
हरीश सरोदेने पॅथॉलॉजी प्रॅक्टिस आणि रोजी रोटीच्या टेस्टस याबद्दल लिहीण्याची विनंती केल्याने "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती" ही लेखमाला लिहायला घेतली आहे. पहा भावते का ?
हरीश ! "मूत्र परीक्षण" सुध्दा वाटते तेवढे सोपे नसते बरे का ! त्याने कधी तुझ्या तोंडाला "फेस" आणलेला आहे का ? माझ्या उमेदवारीच्या काळात म्हणजे १९८३ साली घडलेली एक कथा सांगतो.ऐक.
गाई दुध देतात यात नवल ते काय ? बाई पण कधीमधी दूध देतात यात पण काही नवल नाही ! पण एखादी बाई मूत्रमार्गातून पांढरे शुभ्र "दूध" देऊ लागली तर ?
मला तर क्षणात माझी रेसिडेंसी मधली "ती" शिवाजी महाराजांची केस आठवली.सर्जरी करताना Thoracic Duct तुटल्यामुळे Intercostal Drain मधून टपकणारे "दूध" ! त्यावेळी I/v Methylene Blue वापरून मी निदान केले होते.त्याच Trick ने येथे काम केले असावे का ? वाचा.
मी काय केले ते आधी सांगतो,पण काय करायला पाहिजे होते ते तुम्ही सांगा !
त्या युरीनचे "Triglycerides" मोजले,मायक्रोस्कोपखाली तिच्यातले "Chylomicrons" मोजले.मग समोरच्याच चितळेंच्या दुकानातून पाव किलो "चक्का" मागवला.त्यात चिमुटभर "Sudan III" हा खायचा रंग कालवला व रुग्णाला
गुढी पाडवा नसताना देखील माझ्यातर्फे "चक्क्याची ट्रीट" दिली व लघवी लागेपर्यंत स्वागतकक्षात बसवून ठेवले आणि हेमंतकुमाचे "तुम्हारा इंतजार हैं" हे गाणे गुणगुणत बसलो.आलीच की थोड्याच वेळात ! "गुलाबी रंगाची युरीन" !




Comments