top of page

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग १५"

  • dileepbw
  • Aug 30, 2023
  • 1 min read

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग १५"


हरीश सरोदेने पॅथॉलॉजी प्रॅक्टिस आणि रोजी रोटीच्या टेस्टस याबद्दल लिहीण्याची विनंती केल्याने "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती" ही लेखमाला लिहायला घेतली आहे. पहा भावते का ?

"हिस्टोपॅथ" हीच रोजी रोटी असलेले पॅथाॅलाॅजिस्ट माझ्या काळात एकमेव प्रधान सर ! तसे कोल्हटकरसर देखील फक्त

"हिस्टोपॅथ" करायचे.पण ते केवळ आनंदासाठी ! ती काही त्यांची "रोजी रोटी" नव्हती.तो त्यांचा निवृत्तीपश्चातचा "समाजोपयोगी टाईमपास" होता.त्याचा आमच्या सारख्या नवोदितांना "सेकंड ओपिनियन" घेताना खूप लाभ होत असे. ज्यांना Histo Techniqes सुरू करायची असत त्यांच्यासाठी तर कोल्हटकरसर म्हणजे "आधारवड" च असायचे.माझ्या प्रॅक्टिसच्या "मध्यान्ही" वाघोलीकरसरांनी व बापटसरांनी फक्त "हिस्टोपॅथ" सुरू केली होती.पण त्यांच्याकडे "सेकंड ओपिनियन" साठी जायची वेळ सहजा यायची नाही.असे का ?

हे कारण सांगताना सर्व पूर्णवेळ प्राध्यापकांना एक विनंती करावीशी वाटते की या "हिस्टोपॅथ" ला अभ्यासक्रमात इतके "अवास्तव महत्व" का ? प्रॅक्टिसच्या जेमतेम १०% देखील काम "हिस्टोपॅथ" चे नसते आणि विद्यार्थीदशेत त्यावर ९०% तन व मन झिजलेले असते.असे का ? तो वेळ जर परिसरातील चांगल्या संस्था,चांगले प्रथितयश पॅथाॅलाॅजिस्ट यांच्या लॅबोरेटरीज् मधे घालवला असता तर जास्त लाभ झाला असता असे मला वाटते.

व्यवसाय सुरू केल्यानंतर मला गायनॅकच्या दाणीसरांमुळे व एच.एन.फडणीससरांमुळे Indian Biological Veteranary Products(IBVP), Bharatiya Agro Industries Foundation(BAIF), Manjari Stud Farm अशा ठिकाणी जाऊन उत्कृष्ट "सिमेन बॅंकिंक" शिकता आले.Serum Institute of India(SII) मधे जाऊन "Apheresis" शिकता आले.या संस्थांमधे खरे तर विद्यार्थीदशेतच जायला हवे होते असे खूप वेळा वाटते.उगाच "हिस्टोपॅथ" मधे इतके "रक्त" आटवले.तुम्हाला काय वाटते ?


Recent Posts

See All
"शिष्यात इच्छेत पराजयम"

"शिष्यात इच्छेत पराजयम" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" गुरूवर्य कै.डाॅ.भीमसेन रायचूर यांना विनम्र अभिवादन करून त्यांची एक आठवण...

 
 
 
"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" माझ्या सर्व हयात व दिवंगत गुरूंना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

 
 
 
"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन"

"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन" ©दिलीप वाणी,पुणे आज ५ सप्टेंबर ! शिक्षकदिन ! द्रविडसरांनी स्मरण करून दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page