"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग १६"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग १६"
हरीश सरोदेने पॅथॉलॉजी प्रॅक्टिस आणि रोजी रोटीच्या टेस्टस याबद्दल लिहीण्याची विनंती केल्याने "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती" ही लेखमाला लिहायला घेतली आहे. पहा भावते का ?
"Financial matters do matter in practice"
"हिस्टोपॅथ" ला MD च्या अभ्यासक्रमात दिले जाणारे "अवास्तव महत्व" हे त्याच्या प्रॅक्टिसधल्या जेमतेम १०% सहभागामुळे "Cost-Effective" ठरत नाही,हे वास्तव अमान्य करता येण्यासारखे नाही.
देशमुखसर म्हणतात ते त्रिवार सत्य आहे."असून अडचण नसून खोळंबा" अशी "Stand alone Patholoists" च्या "हिस्टोपॅथ" ची अवस्था आहे.हे "Corporate hospitals" व "Medical colleges" च्या लॅबसाठी सत्य नाही.पण छोट्या व मध्यम "Stand alone Patholoist" साठी हे त्रिकालाबाधित सत्य आहे."तुझे नी माझे(आर्थिक गणित) जमेना,तुझ्या वाचून मला करमेना(बाकीचे काम मिळेना)" अशी "हिस्टोपॅथ" ची परिस्थिती असते.माझे अनुभव सांगतो.
"All surgical branches need histopathology report before & after surgery" हे वादातीत सत्य आहे. पण "Financial matters do matter in practice" हे "वास्तव" आहे.यावर मी कशी मात केली ते आता सांगतो.
"हिस्टोपॅथ" साठी लागणारी जागा,उपकरणे,मनुष्यबळ व कच्चा माल यावर होणारा खर्च व त्यापासून मिळणारे उत्पन्न कामाची पुरेशी "संख्यात्मक पातळी" गाठल्याशिवाय शक्य नसते.यावर उपाय म्हणून "नागपूरकरां" नी एक खूप चांगला मार्ग काढला होता.Centralised Processing !
पुण्यात सगळेच विद्वान ! अहमदशहा अब्दालीशी पानिपतवर लढताना यांच्या सैन्यासाठी डझनावारी "चुली" ! मराठ्यांची वेगळी,मांगांची वेगळी व महारांची वेगळी ! उगाच हरलो का आपण ? त्यामुळे पुण्यात अशी "Centralised Processing" ची सोयच नव्हती.मग मी घारपुरेसरांकडून स्लाईड करून घेऊ लागलो.काम वाढू लागले तसे घारपुरेसरांनीच मला "प्रोत्साहन" दिले व स्वत:चे युनिट सुरू करायला लावले.ते आर्थिकदृष्ट्या जिवंत रहावे म्हणून दोन-चार पॅथॉलॉजीस्टचे काम पण करून देऊ लागलो.
टिश्यू प्रोसेसर फ्रीजच्या डोक्यावर व कपाटातील मायक्रोटोम व वाॅटरबाथ फक्त गरजेच्या वेळी टेबलावर असा "सव्यापसव्य" करायला लागायचा.तरी पण तो अनेक वर्षे केला. शेवटी नागपूरकरांचे शहाणपण पुणेकरांना पटले व मनोज चव्हाणची "Centralised Processing" ची सोय पुण्यात सुरू झाली.




Comments