"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग १७"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग १७"
हरीश सरोदेने पॅथॉलॉजी प्रॅक्टिस आणि रोजी रोटीच्या टेस्टस याबद्दल लिहीण्याची विनंती केल्याने "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती" ही लेखमाला लिहायला घेतली आहे. पहा भावते का ?
पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील एक "लईभारी गंमत-जंमत" आज सांगतो.माझे व्यवसायातले गुरूवर्य डाॅ.मनोहर घारपुरे यांनी एकदा "फ्रुटी" या सीलबंद शीतपेयातील Bacterial Contamination शोधून काढून संपूर्ण "फुड इंडस्ट्री" मधे एकच हलकल्लोळ उडवून दिला होता.अशीच वेळ कधी काळी माझ्यावर येईल अशी सुतराम देखील शक्यता मला तेव्हा वाटली नव्हती.काय घडले असे ? वाचा ही चित्तथरारक कथा !
HIV नुकताच माहित झाल्याचा तो काळ होता.कुणाचे टेस्टिंग प्राधान्याने करायचे हे ठरायचे होते.CSW,Truck Drivers,Jail Inmates असे अनेक जण प्राधान्यक्रमात होते.Dose चा विचार करून मी रक्तदात्यांबाबत आग्रही होतो.शेवटी ते केंद्रीय पातळीवर मान्य करून घेण्यात यशस्वी झालो व रक्तपेढीत त्याचे स्क्रिनिंग सुरू झाले.१००% स्वयंस्फुर्त रक्तदाते असलेल्या माझ्या रक्तपेढीत बरेच दिवस एक ही Positive सापडेना.मन सारखे अस्वस्थ होत होते.हा विनाकारणच आर्थिक बोजा आपण वाढवून घेतला का ?
शेवटी रक्तपेढीतील Blood Grouping Sera तपासायला घेतल्या आणि काय आश्चर्य ! Anti-D ची प्रत्येक बॅच Positive ! नामवंत अमेरिकन कंपनीचे हे हाल तर भारतीय कंपन्यांचे काय ? त्या पण Positive ! मी हादरलोच ! आता काम करणार तरी कसे ? आधी सर्वांना ग्लोव्ज सक्तीचे केले. मुंबईहून फ्रेंच कंपनीच्या Blood Grouping Sera मागवल्या. फ्रेंच शास्त्रज्ञ "लक माॅंतेनिये" च्या अथक प्रयत्नाने फ्रेंच कंपन्यांना HIV Free Blood Grouping Sera बनवण्यात यश आलेले होते.
ही बाब लपवून ठेवण्यासारखी नव्हती.मी IAPP च्या सभेत सर्वांना आपआपल्या Blood Grouping Sera तपासायला लावल्या.अनेकांकडच्या Positive आल्या.मला धीर आला व गुरूवर्य डाॅ.मनोहर घारपुरे यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून अमेरिकन कंपनीबरोबर "कायदेशीर लढा" सुरू केला.




Comments