"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २"
हरीश सरोदेने पॅथॉलॉजी प्रॅक्टिस आणि रोजी रोटीच्या टेस्टस याबद्दल लिहीण्याची विनंती केल्याने "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती" ही लेखमाला लिहायला घेतली आहे. पहा भावते का ?
PG करीत असताना Histo म्हणजेच पॅथाॅलाॅजी,बाकी सब बकवास ! असा माझा "गोड गैरसमज" होता.गुरुजनांकडून देखील Histo च जास्त शिकवली जायची.माझा रुम पार्टनर
मेडीसिनचा डाॅ.चंद्रकांत कासट हा हिमॅटचा भोक्ता ! डी ग्रुशी माझ्या आधी त्यानेच संपूर्ण वाचला.त्याच्या प्रश्नांच्या भडिमारातूनच मी बरीचशी हिमॅट शिकलो.हरीश म्हणतो त्याप्रमाणे हिमॅट हीच खरी आपली "रोजी रोटी" ! त्यामानाने Histo ही बहूसंख्य पॅथॉलॉजीस्टसाठी "सटी सहामाशी" घडणारी गोष्ट ! नाही का ?
PG करीत असताना ज्या बायोकेमिस्ट्रीकडे आपण संपूर्णपणे दुर्लक्ष करीत असतो तिच तर खरी आपली "अन्नदाता" असते.पण ती "निर्बुध्द यंत्रा" ला देखील समजते म्हणून आपण तिला "गौण" मानतो.पण जेव्हा ती आपल्या हातातून निसटते तेव्हा मात्र आपला जीव कासावीस होतो व आपला शासनाशी कायदेशीर संघर्ष उभा ठाकतो.
मायक्रोबायाॅलाॅजीचा अभ्यास मी MD परीक्षेच्या आधी जेमतेम महिनाभर केला.कारण पहिल्यांदाच आमची परीक्षा M.D. Pathology अशी घेतली जाणार असल्याची घोषणा झाली होती.त्याआधी ती M.D. Pathology & Bacteriology अशी होत असे.पण काय जादू झाली ते मला आज देखील कळलेले नाही.परीक्षेच्या जेमतेम एक महिना आधी परीक्षा M.D. Pathology & Bacteriology सारखीच होईल असे जाहीर करण्यात आले.त्यामुळे माऊस, रॅट,रॅबिट,गिनीपिग,हॅमस्टर असे प्राणी पार ओळखण्यापासून ते हाताळण्यापर्यंतची सर्व "कसरत" शिकावी लागली.
शिक्षणाची व व्यवसायाची अशी कुणाकुणाची "फारकत व फरफट" झाली आहे ? अवश्य लिहा.पुढच्याला ठेच मागचा शहाणा !




Comments