"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २१"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २१"
माझे "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती" हे "स्मृतीरंजन" चालू असताना संजय पाटील पण "फ्लॅश बॅक" मधे गेला व एक चांगले गीत गात गात त्याने त्याचा सगळा "जीवनपट" च उलगडून दाखवला.हा "आठवणींचा खजिना" "दहीहंडी" सारखाच असतो.सर्व गोपाळांनी मिळून ही हंडी फोडल्याशिवाय त्यातील "गोपाळकाला" बाहेर पडत नाही. सर्वांनीच संजय पाटीलसारखी "दहीहंडी" फोडावी.हे विनम्र आवाहन !
पुण्यात ऑटोमेशनचे "पांढरे हत्ती" मुंबईच्या धनवान "मेडीनोव्हा" या कंपनीने आणले खरे पण त्यांना खायला
"मोत्यांचा चारा" काही "मेडीनोव्हा" जमा करू शकले नाही व त्यांना यथावकाश आपला "गाशा" गुंडाळावा लागला होता.
हा छोट्या व मध्यम आकाराच्या लॅबोरेटरीजसाठी "मोठाच धडा" होता.त्यामुळे ऑटोमेशनच्या तंत्रज्ञानापेक्षा त्याचे "अर्थकारण" हाच मोठा अभ्यास होऊन बसला."खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा" असे करून आम्हाला चालणार नव्हते.अजित गोळविलकरसर सोडले तर पुण्यात कोणीही आर्थिकदृष्ट्या "स्ययंप्रकाशी" नव्हते.सगळेच बॅंके भोवती फिरणारे "चंद्र" ! बॅंक चमकली तर आम्ही चमकणार ! असे "परप्रकाशी" !




Comments