"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २२"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २२"
पुण्यात ऑटोमेशनचे "पांढरे हत्ती" मुंबईच्या धनवान "मेडीनोव्हा" या कंपनीने आणले खरे पण त्यांना खायला
"मोत्यांचा चारा" काही "मेडीनोव्हा" जमा करू शकले नाही व त्यांना यथावकाश आपला "गाशा" गुंडाळावा लागला होता.
हा एक प्रकारे Stand Alone लॅबोरेटरीज् साठी जसा मोठा धडा होता तसाच तो "आशेचा किरण" देखील होता."मोठ्या माशाकडून लहान मासा गिळला जातो" हे जगण्याचे तत्वज्ञान ! जीवो जीवस्य जीवनम् ! पण मोठ्या माशाने समुद्रात विहार करायचा असतो.पुणेरी पेठांच्या डबक्यात नाही ! त्यामुळे आम्ही पटकन आमच्या मर्यादा ओळखल्या व आम्हाला अनुरूप असे "वधूसंशोधन" सुरू केले.
त्यावेळी मुख्यत: जपान,जर्मनी,अमेरिका अशा देशांच्या "वधू" उपलब्ध असायच्या.त्यातलीच एखादी सुबक,सुंदर, ठेंगणी,ठुसकी निवडावी लागायची.बॅंकेने मंजूर केलेल्या कर्जाचा(Finance) अंदाज घेत,आपल्या घरी असलेला "चारा(Work Load) मोजत,तिच्या मेकअप(Reagents) ला लागणार्या खर्चाचा अंदाज घेत,मधेच ती रूसली तर तिला सिनेमाला न्यायचा खर्च(Maintenance,Servicing & Repairs) अशा एक ना हजार गोष्टींचा विचार करावा लागायचा.कशी असायची ही निवड ? वाचा.मी नंबर दिलेले "कंस" घालतो, तुम्ही तो सोडवायचा बरं का !
चाँद सी महबूबा(१) हो मेरी
कब ऐसा मैंने सोचा था
हाँ तुम बिलकुल वैसी(२) हो
जैसा मैंने सोचा था
ना कसमें(३) हैं ना रस्में(४) हैं
ना शिकवे(५) हैं ना वादे(६) हैं
इक सूरत भोली(७) भाली है
दो नैना(८) सीधे साधे हैं
ऐसा ही रूप(९) खयालों में था
जैसा मैंने सोचा था
हाँ तुम बिलकुल वैसी हो
जैसा मैंने सोचा था
मेरी खुशियाँ(१०)ही ना बाँटे
मेरे ग़म(११) भी सहना चाहे
देखे ना ख्वाब(१२) वो महलों(१३) के
मेरे दिल(१४)में रहना चाहे
इस दुनिया में कौन(१५) था ऐसा
जैसा मैंने सोचा था
हाँ तुम बिलकुल वैसी हो
जैसा मैंने सोचा था




Comments