"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २३"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २३"
"ऑटोमेशन" चे "कंस" कोडे सर्वांनीच सोडवा.पहा कशी मजा येते ते ! सगळ्यांच्याच व्यावसायिक जीवनाचा चित्रपट उलगडणारे कोडे आहे हे !
माझ्या बायोकेमेस्ट्रीमधील पहिल्या "ऑटोमेशन" चा किस्सा या आधीच्या एका लेखात तुम्हाला सांगीतला.त्यासाठी पहाटे दोन वाजेपर्यंत माझ्या लॅबमधे चाललेला काही पॅथॉलॉजीस्टचा "सामूहीक काथ्याकुट" व त्यानंतर उदरभरणासाठी डेक्कनवरील "लकी रेस्टाॅरंट" मधे मागच्या द्वारातून चोरून-छपून केलेला प्रवेश काही पॅथॉलॉजीस्टना व काही वैद्यकीय प्रतिनिधींना आज देखील नक्कीच आठवत असेल.आठवते का कोणाला ? राजू राणे ? पी.के.शर्मा ?
बायोकेमेस्ट्रीमधील नववधू(Stangen-BTR 320) दारात येऊन उभी राहिली खरी ! पण आल्या आल्या तिने काय मागावे ? नक्षीच्या,कलाबूत काढलेल्या,महागड्या "लाल चपला (Micropipettes)" ! त्यासाठी पुन्हा बॅंकेचे दार ठोठवावे लागले.तो पर्यंत रूसून कोपर्यात बसलेल्या Colorimeter(ERMA Japan) चे अक्षरश: पाय धरून माफी मागीतली.तेव्हा कुठे ती पुन्हा काम करायला तयार झाली.
नववधूला "लाल चपला" आणून दिल्या तर या "महाराणी" ला माझ्या घरात उकडायला लागले.सगळीकडे "धूळ" आहे म्हणू लागली. त्यामुळे मला सतत "शिंका" येतात असे म्हणू लागली. "मेरी काली कलुटीके नखरे बडे" म्हणत झक मारत
A/c आणला.पुन्हा "धनको" चे पाय धरावे लागले.
एकदाची "नववधू" स्वयंपाकघरात तर शिरली ! मग "चुलीचा धूर" डोळ्यात जाऊन माझे नाजूक नेत्र चुरचुरतात असे म्हणू लागली.इतके दिवस याच चुलीवर स्वयंपाक केलेली प्रथम पत्नी(Colorimeter - ERMA Japan) माझ्या कडे "फुरंगटून" पहातच राहिली.पण नवीन लन करायची हौसच दांडगी ना ! मग पळत जाऊन बाजारातून "सूर्या चूल (Voltage Stabiliser)" घेऊन आलो.सर्वांचे अनुभव असेच ना ?




Comments