"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २५"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २५"
"ऑटोमेशन" चे "कंस" कोडे सर्वांनीच सोडवा.पहा कशी मजा येते ते ! सगळ्यांच्याच व्यावसायिक जीवनाचा चित्रपट उलगडणारे कोडे आहे हे !
"ऑटोमेशन" करायला लावण्याचा एक "कमर्शियल फंडा" या निमित्ताने सर्वांना सांगतो.आधी हा जैसलमेर" चा किस्सा ऐका. तेथील "पटवा हवेली" हे पर्यटनस्थळ कुणीकुणी पाहिलेले आहे ? कुणाच्या जीवावर बांधलेले आहे ते ? ऐका.
Trans-rectal Route ने अफू कशी देतात माहित आहे ? टमरेलच्या बुडाशी एक अफूची गोळी चिकटवायची.तिच्यातून झिरपलेली अफू 'व्यसनाधिन" करायला पुरेशी आहे.अशा प्रकारे "व्यसनाधिन" केलेल्या शेकडो कामगारांच्या कष्टावर ही "हवेली" उभारलेली आहे.
श्रीकांत नावाचा Coulter चा प्रतिनिधी "हिमॅट ऑटोमेशन" गळी उतरवण्यासाठी हेच तंत्र वापरत असे.तो त्याचा Electronic Cell Counter प्रस्तावित गिर्हाईकाच्या लॅबमधे "विनामूल्य" नेऊन ठेवीत असे.हिमोग्लिबन व प्लेटलेट्स यांच्यावरून लॅबमधे रोज होणार्या "हाणामार्या" त्यामुळे संपुष्टात येत असत.त्यामुळे Electronic Cell Counter ची "चटक" लागायची व तो आपसुकच विकत घेतला जायचा.
त्यानंतरची "श्रीकांतची खेळी" असायची क्लिनिशियन मंडळींना RDW बद्दल जागरूक करायचे.मग त्यांच्या आग्रहास्तव थॅलेसेमिया निदानाच्या नावाखाली पॅथॉलॉजीस्ट मंडळी "Five Part Differential Electronic Cell Counter" ची खरेदी करायचे.असे हे "ऑटोमेशन" मागचे "अर्थकारण" !




Comments