top of page

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २६"

  • dileepbw
  • Aug 30, 2023
  • 1 min read

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २६"


"ऑटोमेशन" चे "कंस" कोडे सर्वांनीच सोडवा.पहा कशी मजा येते ते ! सगळ्यांच्याच व्यावसायिक जीवनाचा चित्रपट उलगडणारे कोडे आहे हे !

"हिमॅट ऑटोमेशन" चे फायदे-तोटे सांगणारे मनचंदा मॅडमचे व्याख्यान अनेक वेळा अनेक ठिकाणी ऐकल्यानंतर एक गोष्ट मी मनाशी अगदी निश्चित केली.ती म्हणजे Microscopy ला पर्याय नाही.त्यामुळे शेवटपर्यंत मी PBS पहाणे कधीच बंद केले नाही.अगदी Routine ANC केसमधे सुध्दा ! Cell Counter हा आंधळा स्पर्शावरून(Diffraction) नाणी (Cells) अचूकपणे ओळखतो पण ती खरी का खोटी (Abnormal Cells) हे त्याला कधीच दिसत नसते.हे त्रिवार सत्य आहे व ते क्लिनिशियन्सना सांगायलाच हवे.मी अशी अनेक व्याख्याने घेतली.गोखलेसरांना आठवत असतीलच.

मुंबईचे सुप्रसिध्द क्लिनिकल हिमॅटाॅलाॅजिस्ट डाॅ.एम.बी. आगरवालसरांची पुण्यातील एकही व्याख्याने मी चुकविलेली नाहीत.काही व्याख्याने तर मुंबई व नाशिकला जाऊन पण ऐकली. ती ऐकल्यावर Cell Counter मुळे काहीही "शहाणपण" येत नाही हा समज दृढच होत गेला.केल्याने देशाटन,पंडीत मैत्री,सभेत संचार,मनुजा चातुर्य येतसे फार ! हेच खरे.ज्ञान विकत घेता येत नाही.ते "आत्मसात" च करावे लागते.

Recent Posts

See All
"शिष्यात इच्छेत पराजयम"

"शिष्यात इच्छेत पराजयम" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" गुरूवर्य कै.डाॅ.भीमसेन रायचूर यांना विनम्र अभिवादन करून त्यांची एक आठवण...

 
 
 
"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" माझ्या सर्व हयात व दिवंगत गुरूंना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

 
 
 
"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन"

"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन" ©दिलीप वाणी,पुणे आज ५ सप्टेंबर ! शिक्षकदिन ! द्रविडसरांनी स्मरण करून दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page