"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २७"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २७"
"ऑटोमेशन" चे "कंस" कोडे सर्वांनीच सोडवा.पहा कशी मजा येते ते ! सगळ्यांच्याच व्यावसायिक जीवनाचा चित्रपट उलगडणारे कोडे आहे हे !
बायोकेमेस्ट्री व हिमॅटाॅलाॅजीचे "ऑटोमेशन" केल्यानंतर आता कशाचे बरे "ऑटोमेशन" करावे ? अशा विवंचनेत असतानाच "Spermomat" नावाचे Automatic Semen Anayser" हे उपकरण दृष्टीपथात आले.शुक्राणूंची अचूक संख्या व त्यांची अचूक "गती व मती" सांगणारे हे यंत्र काही केल्या मनाला भावेना.कारण त्याचा "व्यावहारीक उपयोग" च लक्षात येईना.
माझ्या Infertologist मित्राशी सल्लामसलत केली तर तो म्हणाला त्यापेक्षा Grade IV Motility वाले Sperms वेगळे करून दे.जमले तर Y chromosome धारी टिपून दे. त्यामधून काही HBsAg,HCV,HIV,Thalassaemia असे काही जाणार नाही ना ? ते सांग.पुढील पिढीने या गोष्टींचा जरूर विचार करायला हवा.




Comments