top of page

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २८"

  • dileepbw
  • Aug 30, 2023
  • 2 min read

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग २८"


"ऑटोमेशन" चे "कंस" कोडे सर्वांनीच सोडवा.पहा कशी मजा येते ते ! प्रधानसर व तत्सम पॅथॉलॉजीस्ट सोडून सगळ्यांच्याच व्यावसायिक जीवनाचा चित्रपट उलगडणारे कोडे आहे ते !

बायोकेमेस्ट्री व हिमॅटाॅलाॅजीचे "ऑटोमेशन" केल्यानंतर आता कशाचे बरे "ऑटोमेशन" करावे ? अशा विवंचनेत असतानाच

"Histopathology" चे काय करता येईल याचा विचार सुरू केला.

प्रताप म्हणतो त्याप्रमाणे केवळ "रंग संगती" पहाणारा हा विभाग कधी "ऑटोमेट" होईल असे मला तेव्हा स्वप्नात देखील वाटले नव्हते.Morphological Diagnosis देणारा हा विभाग पुढे IHC खाऊन टाकेल असे देखील वाटले नव्हते. IAPP meetings मधे "IHC" ची चर्चा व्हायची तेव्हा प्रधानसर Chemotherapy चे वास्तव सांगायचे.आज ते दिवस जवळ येऊन ठेपले आहेत.रूग्णांना Customised Chemotherapy मिळू लागली आहे.आता तर रक्त तपासूनच Histopathology" चे निदान (Cancermimetic Antigens) द्यायची सोय उपलब्ध झालेली आहे.

प्रधानसरांनी म्हटल्याप्रमाणे "Histopathology" मधे

"आपणच आपल्या चुकीला जबाबदार असतो" व जसे तुमचे केस पिकत जातात तसे तुम्हाला कमी श्रमात जास्त धनप्राप्ती होत जाते.प्रधानसरांनी गमतीने म्हटल्याप्रमाणे पांढर्‍या कोटापेक्षा निळ्या(Haematxyline) ठिपक्यांचा गुलाबी(Eosine) कोटच जास्त भाव खाऊन जातो.

हरीशने म्हटल्याप्रमाणे Stand Alone Laboratory मधे होणारी Histopathology अगदीच मर्यादित ! मोठ्या शस्त्रक्रिया जर मोठ्या रुग्णालयांमधून होत असतील तर मोठी Histopathology तिथल्या पॅथॉलॉजीस्टनाच पहायला मिळणार ना ? असे हे Histopathology चे "स्थानमहात्म्य" !

यावर तोडगा म्हणून मी पुणे महानगरपालिकेच्या रूग्णालयांचा Histopathologist म्हणून जवळ जवळ ४० वर्ष काम केले.तेव्हा पुर्णवेळ पॅथॉलॉजीस्ट अनघा जोगचे खूपच सहकार्य लाभले.जुन्नरकरसरांच्या खुर्चीवर बसून भरपूर काम करायला मजा वाटायची खरी पण "आमदानी आठ अन्नी" ! त्यामुळे तुलनेने Histopathology हा काही माझ्या "रोजीरोटी" चा भाग होऊ शकला नाही.

नंतर शांतपणे भारती विद्यापीठात "मानद प्राध्यापक" म्हणून जायला सुरूवात केली व "गृप ऑफ सेव्हन" ने दीक्षा दिल्याप्रमाणे Exam going PGs कडून व सहप्राध्यापकांकडून विशेषत: ज्योत्स्ना करंदीकरमॅडम कडून स्वत:ला Histopathology मधे Update करायला सुरूवात केली.दूधाची तहान ताकावर तर भागली !

नंतर ही तहान माझ्या लॅबमधेच भागावी म्हणून मी FNAC शिकायला सुरूवात केली.तो किस्सा पुढच्या लेखात !

Recent Posts

See All
"शिष्यात इच्छेत पराजयम"

"शिष्यात इच्छेत पराजयम" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" गुरूवर्य कै.डाॅ.भीमसेन रायचूर यांना विनम्र अभिवादन करून त्यांची एक आठवण...

 
 
 
"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" माझ्या सर्व हयात व दिवंगत गुरूंना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

 
 
 
"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन"

"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन" ©दिलीप वाणी,पुणे आज ५ सप्टेंबर ! शिक्षकदिन ! द्रविडसरांनी स्मरण करून दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page