"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ३"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ३"
हरीश सरोदेने पॅथॉलॉजी प्रॅक्टिस आणि रोजी रोटीच्या टेस्टस याबद्दल लिहीण्याची विनंती केल्याने "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती" ही लेखमाला लिहायला घेतली आहे. पहा भावते का ?
प्रताप,हरीश,मंगल यांच्या उत्साहवर्धक प्रतिक्रिया वाचून ही लेखमाला पुढे चालू ठेवायला हुरूप आला.आपले MD चे शिक्षण हे फक्त "मेंदूची हायपरट्राॅफी" करणारे असते की काय ? त्यासाठी "पोटाची एट्राॅफी" कशाला करायची ना ! मंगलने "पोटा" कडे जरा तरी लक्ष दिले हे वाचून बरे वाटले.
माझ्यावेळची MD ची परीक्षा घेण्यासाठी एक्स्पर्ट विजय भंगाळेने खूपच कष्ट घेतले होते.तीन काॅट्सवर तीन रूग्ण, चिठ्ठ्या काढून रूग्णाची निवड,त्याचे सर्वांगीण वैद्यकीय परीक्षण,टेस्टचे प्रिस्किप्रशन,त्यापैकी परीक्षक सांगेल ती टेस्ट रुग्णाचे रक्त स्वत: काढून व बायोकेमेस्ट्री विभागात जाऊन स्वत: ती टेस्ट करून रॅक दाखवायला पुन्हा परीक्षकाकडे यायचे व "Clinical Pathology" ची तोंडी परीक्षा द्यायची असा परीक्षेचा कार्यक्रम आखण्यात आला होता.एवढ्या अल्प अनुभवावर "Clinical Pathology Practice" आयुष्यभर सांभाळून न्यावी लागली.हे चित्र बदलायला हवे.




Comments