"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ३१"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ३१"
"ऑटोमेशन" चे "कंस" कोडे सर्वांनीच सोडवा.पहा कशी मजा येते ते ! सगळ्यांच्याच व्यावसायिक जीवनाचा चित्रपट उलगडणारे कोडे आहे हे !
बायोकेमेस्ट्री व हिमॅटाॅलाॅजीचे "ऑटोमेशन" केल्यानंतर आता कशाचे बरे "ऑटोमेशन" करावे ? अशा विवंचनेत असतानाच "Microbiolgy" कडे लक्ष वळले.बर्याच पॅथॉलॉजीस्ट मित्रांना Cultures करणे हे मोठे कटकटीचे काम वाटत असे.त्यामुळे ते त्यांचे काम माझ्याकडेच पाठवत असत. त्यामधे राजेंद्र कावरे हा एक महत्वाचा सहभागी होता.एकदा त्याच्याकडे Clostridia साठी नमुना आला व माझी चांगलीच धावपळ उडाली.कारण Anaeobic Cultures मी कधी केलेली नव्हती.मग माझे व्यावसायिक गुरू डाॅ.मनोहर घारपुरेसरांकडे धाव घेतली.त्यांच्याकडे मिलिंद वाटवेंच्या Dynamicro कंपनीचा Anaeobic Jar होता.तो वापरून तो "बाका प्रसंग" निभावून गेला.
सुरूवातीला माझ्या Culture Media मी स्वत:च बनवायचो.पण वरचेवर होणारे Bacterial Contamination व त्यांचा संपुर्ण इमारतीत दवळणारा "सुगंध"(का कोण जाणे पण सहनिवाशांना तो दुर्गंध वाटत असे.) या मुळे होणार्या भांडणांना कंटाळून मी तो "कुटिरोद्योग" बंद करून टाकला.दिलीपकुमार पण लताताईंच्या हिंदी भाषेला अशाच शिव्या घालायचा ना ?
यथावकाश बाजारात Microbiolgy चे देखील "Bactech" या नावाने "ऑटोमेशन" आले.पण तो पर्यंत व्ही.डी.के. ने कवटकर मॅडमच्या अधिपत्याखाली Microbiolgy ही Superspeciality सुरू केलेली असल्याने माझे "Microbiolgy ऑटोमेशन" बारगळले.




Comments