"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ४"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ४"
हरीश सरोदेने पॅथॉलॉजी प्रॅक्टिस आणि रोजी रोटीच्या टेस्टस याबद्दल लिहीण्याची विनंती केल्याने "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती" ही लेखमाला लिहायला घेतली आहे. पहा भावते का ?
आपले PG चे शिक्षण अधिक सर्वसमावेशक व्हायला हवे असे मला वाटते.लॅबोरेटरीचे नियोजन,रचना,सुरक्षा, व्यवस्थापन,अर्थकारण,समाजकारण,राजकारण अशा प्रॅक्टिसमधे लागणार्या गोष्टींचे "ओ की ठो" ज्ञान आपल्याला दिले जात नाही.हे ज्ञान "धडपडत" शिकता येतेच पण त्यात "ढोपरे" फुटतात.त्याचे काय ? हे वाचवता येणे शक्य नाही का ? MD.(Transfusion Medicine) चा Syllabus ठरवताना या सर्व गोष्टींचा विचार केलेला आहे.मग Pathology मधे का नाही ?
या गोष्टींचे शिक्षण मला कोणत्याही पुस्तकाने दिलेले नाही.ते प्रथम दिले विजाने व नंतर विविध वैद्यकीय प्रतिनिधींनी, बॅंकेने व संपूर्ण समाजाने ! गोखले सरांच्या घरी माझा MD चा "विजयोत्सव" साजरा होताच विजय भंगाळेने माझ्या हातात अभ्यासासाठी एक "बाॅक्स फाईल" ठेवली.त्यात पॅथॉलॉजी प्रॅक्टिस सुरु करण्यासाठी लागणार्या "पिन टू पियानो" अशा सर्व गोष्टींची यादी,त्यांचे उत्पादक,वितरक, किमती,बर्या-वाईटाचे तुलनात्मक तक्ते अशा "एक ना भाराभर,खंडीभर" गोष्टी होत्या.जणू काही "अलिबाबाची गुहा" ! ही गुहा पॅथॉलॉजी डिपार्टमेंटने का बरे दाखवली नाही ?




Comments