"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ४०"
- dileepbw
- Sep 2, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ४०"
© दिलीप वाणी,पुणे
"ऑटोमेशन" चे "बत्तासे" संपले म्हणून प्रतापने "छंद" ही नवीन "दही हंडी" फोडली आहे.पण त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला नाही.त्यामुळे नवीन "दही हंडी" फोडण्याची आवश्यकता आहे.पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील "भांडणे" हा विषय कसा वाटतो ? ऐका.
HIV नवीन असतानाचा हा फार मोठ्या भांडणाचा किस्सा आहे.तेव्हा HIV Tests अगदीच बाल्यावस्थेत होत्या. रक्तदात्यांसाठी म्हणून पुण्यात प्रथम सुरूवात मलाच करावी लागली होती.NIV सोडूनअन्य कुणीच HIV Test करीत नसत.तातडीसाठी Haemagglutination व रुटीनसाठी Whole Viral Lysate Generation I ELISA अशा दोनच HIV Tests उपलब्ध होत्या.दोन्हीला सुमारे २२% Cross reactivity होती.त्यामुळे HIV infection नसतानाच बर्याचदा टेस्ट रिॲक्टिव्ह येत असत.त्याचे कन्फर्मेशन देखील करता येत नसे.त्यामुळे ती एक मोठीच "डोकेदुखी" होती.
अशा परिस्थितीत टाटा मोटर्सच्या Pre-employment Check up मधे एक तरूण "पाॅझिटिव्ह" आला.मी टाटा मोटर्सचा Consultant Pathologist असल्याने तेथील वैद्यकीय प्रमुख डाॅ.लाला तेलंग यांनी मला सल्ला मसलतीसाठी पिंपरीला बोलावून घेतले.माधुरी आपटेचे यजमान डाॅ.राम आपटे हे देखील त्या बैठकीला उपस्थित होते. तेथे मी सर्वांचेच HIV Screening वर एक छोटेसे "बौध्दिक" घेतले.पण Cross reactivity समजून देखील टाटा मोटर्सने त्याला नियुक्तीपत्र दिले नाही.त्यामुळे तो तरुण माझ्यावरच भडकला व लॅबमधे येऊन "तोडफोड" करायची भाषा करू लागला.कशीबशी त्याची समजूत काढून त्याला NiV मधे Western Blot या अद्ययावत टेस्टसाठी पाठविले. तेथे तो "निगेटिव्ह" आला व त्यामुळे टाटा मोटर्समधे रूजू झाला.
या प्रकरणातून मी "कानाला खडा" लावला.रिपोर्टमधे "पाॅझिटिव्ह" या शब्दाऐवजी "रिॲक्टिव्ह" हा शब्दप्रयोग सुरू केला.सर्व "खुलासा(Disclaimer)" आधीच रिपोर्टमधे छापायला सुरूवात केली.हे "कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित फाॅर्म्याट" समस्त पुणे शहरात चांगलेच लोकप्रिय झाल्याचे अनेकांना आठवत असेल.या अनुभवाचा पुढे "राष्ट्रीय धोरण" ठरवताना कसा मोलाचा उपयोग झाला ते पुढच्या लेखात सांगेन.




Comments