"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ४१"
- dileepbw
- Sep 2, 2023
- 1 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ४१"
© दिलीप वाणी,पुणे
"ऑटोमेशन" चे "बत्तासे" संपले म्हणून प्रतापने "छंद" ही नवीन "दही हंडी" फोडली आहे.पण त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला नाही.त्यामुळे नवीन "दही हंडी" फोडण्याची आवश्यकता आहे.पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील "भांडणे" हा विषय कसा वाटतो ? ऐका.
रक्तदात्यांच्या HIV Screening साठी वापरली जाणारी "Whole Viral Lysate - Generation I ELISA" ही एक मोठीच "डोकेदुखी" होती.तिला सुमारे २२% Cross reactivity असल्यामुळे HIV infection नसतानाच बर्याचदा टेस्ट "रिॲक्टिव्ह" येत असे.रक्तपेढीमधे त्याचे कन्फर्मेशन देखील करता येत नसे.
अशा रक्तदात्यांचे "समुपदेशन" करणे म्हणजे "तारेवरची कसरत" च असे.सर्व रक्तपेढ्यांचे डाॅक्टर्स हे "समुपदेशन" करायला खूप घाबरत असत.त्यामुळे जनकल्याण रक्तपेढीमधेच मी स्वयंस्फुर्तीने एक "समुपदेशन केंद्र" सुरू केले होते.याची ख्याती अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष मा.श्री.बिल क्लिंटन व सुप्रसिध्द अमेरिकन उद्योगपती श्री.बिल गेटस् यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली व त्याची परिणिती पुढे एका मोठ्या उपक्रमात झाली.ते एका वेगळ्या लेखात अवश्य सांगेन.आज "समुपदेशन" चा एक मजेशीर किस्सा सांगतो.ऐका.
अशाच एका "HIV रिॲक्टिव्ह" रक्तदात्याचे "समुपदेशन" करीत होतो.आडून आडून "लैंगिक इतिहास" घेण्याचे माझे काम चालू होते.शेवटी कंटाळून माझे सहकारी डाॅ.आनंद चाफेकर यांनी सरळ "बाॅंबहल्ला" केला."बाईकडे जातोस का ?" त्याने नाही म्हणताच चाफेकरांचा दुसरा "बाॅंबहल्ला" ! मग काय "बाबा" कडे जातोस का ? आता "बाॅंबहल्ला" रक्तदात्याने केला.चक्क "हो" म्हणाला ! चाफेकरांचा पुढचा प्रश्न "किती जण आहात ?" तो म्हणाला "बारा" ! चाफेकरांचा पुढचा सल्ला "जा ! सगळ्यांना रक्त तपासणीसाठी घेऊन ये.
"HIV समुपदेशन केंद्र" मधील अशा अनेक गमती-जमती, भांडणे,समज-गैरसमज यांचे किस्से अनेकांकडे असतील.जरूर लिहा.




Comments