top of page

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ५"

  • dileepbw
  • Aug 30, 2023
  • 1 min read

"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ५"


हरीश सरोदेने पॅथॉलॉजी प्रॅक्टिस आणि रोजी रोटीच्या टेस्टस याबद्दल लिहीण्याची विनंती केल्याने "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती" ही लेखमाला लिहायला घेतली आहे. पहा भावते का ?

"पुस्तकी ज्ञान" वेगळे व "व्यावहारिक ज्ञान" वेगळे ! माझी एक Patho OPD मधली आठवण सांगतो.करंदीकर मॅडम OPD प्रमुख होत्या.मी RP ! एकदा अचानक Urine Exam चे जणू काही "पेव" फुटले.इतके की स्लाईड ट्रे कमी पडू लागले.विशेष म्हणजे सगळी Urine Deposits एक सारखी ! एकात एक Epithelial cell किंवा Pus cell दिसेल तर शप्पथ ! मी उघड्या डोळ्यांनी ट्रे कडे "आ वासून" पहातच राहिलो.एका ही Urine Deposit ला ना रंग, ना रूप ! सगळी कशी लक्स साबणात न्हाऊन निघालेल्या हेमा मालिनीसारखी पांढरी शुभ्र ! पाणीदार !

"संशय का मनी आला" हे नाट्यगीत गुणगुणत मी Patho OPD तून बाहेर गेलो.बाहेर "पोरसवदा" वयातील पोरांची ही भली मोठी रांग ! एकाला विचारले कसली रे गर्दी ? "पोलिस भरती" आहे म्हणाला.मी विचारले का रे ! एवढी शे-दोनशे पोरे एकाच वेळी लघवीला जातील असे "टाॅयलेट" कुठे सापडले रे तुम्हाला ? तो "गोरामोरा" झाला व म्हणाला साहेब आम्ही सगळे "नळा" वरुन बाटल्या भरून आलो आहोत. "औषध नळ गे मला" म्हणत मी कपाळावरच हात मारून घेतला व तातडीने करंदीकर मॅडमकडे धाव घेतली.

"NAD" असे लिहीलेले सर्व Urine Reports तातडीने माघारी घेतले व गठ्ठाच्या गठ्ठा करंदीकर मॅडमकडे पुढे नेऊन ठेवला.त्यावर लेक्चरर पासून प्रोफेसर पर्यंत सर्वांच्याच सह्या होत्या बरं !

या प्रसंगातून प्राप्त झालेले "व्यवहारज्ञान" माझ्या पॅथॉलॉजी प्रॅक्टिसमधे कसे उपयोगी ठरले व मी "कोर्टाची पायरी" चढण्यापासून कसा वाचलो ते पुढील लेखात अवश्य वाचा.

Recent Posts

See All
"शिष्यात इच्छेत पराजयम"

"शिष्यात इच्छेत पराजयम" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" गुरूवर्य कै.डाॅ.भीमसेन रायचूर यांना विनम्र अभिवादन करून त्यांची एक आठवण...

 
 
 
"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

"शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा" ©दिलीप वाणी,पुणे आजच्या "शिक्षक दिनी" माझ्या सर्व हयात व दिवंगत गुरूंना शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

 
 
 
"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन"

"एका पॅथाॅलाॅजिस्टचा शिक्षकदिन" ©दिलीप वाणी,पुणे आज ५ सप्टेंबर ! शिक्षकदिन ! द्रविडसरांनी स्मरण करून दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार !...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page