"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ९"
- dileepbw
- Aug 30, 2023
- 2 min read
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती-भाग ९"
हरीश सरोदेने पॅथॉलॉजी प्रॅक्टिस आणि रोजी रोटीच्या टेस्टस याबद्दल लिहीण्याची विनंती केल्याने "पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील गमती-जमती" ही लेखमाला लिहायला घेतली आहे. पहा भावते का ?
या लेखात "दिव्या खाली अंधार" हा किस्सा सांगतो.एकदम भारी आहे.लक्षपूर्वक ऐका.
एकाच वेळी रक्तपेढी व पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरी चालवणे ही "सूळावरची पोळी" असते.साधे हिमोग्लोबिन तपासणीचेच उदाहरण घ्या ना ! रक्तपेढीतली काॅपर सल्फेटची हिमोग्लोबिन तपासणी म्हणजे "बुड बुड घागरी" ! तू खीर खाल्लीस तर बुड घागरी ! ज्याची घागर बुडेल तो रक्तदाता ! ज्याची तरंगेल त्याने मुकाट घरी जायचे !
काॅलेजमधे II MBBS ला असताना कल्पना पै मॅडमच्या शुभहस्ते माझे आयुष्यातले पहिले रक्तदान झाले.म्हणजे तेव्हाच माझी "बुड बुड घागरी" झाली होती.वयाच्या ३३ वर्षापर्यंत माझ्या रक्तदानाने "अर्धशतक" गाठले. नंतर मधुमेहाच्या कौटुंबिक समस्येमुळे मी रक्तदानातून बाद झालो खरा ! पण तोपर्यंत माझी घागर "पन्नास" वेळा बुडाली होती.
"पॅथॉलॉजी प्रॅक्टिस" करताना रक्तपेढीतील या काॅपर सल्फेटचा काही उपयोग नव्हता.तेथे लोकांना नुसता "मटका" नको तर "आकडा" हवा होता.त्यासाठी "साहली उपकरण" हवे.ते निवडायचे कसे ? उल्हासनगरचे एकदम स्वस्तातले USA(Ulhasnagar Sindhi Association) Make "डिस्को" जसे उपलब्ध होते तसेच युनायटेड स्टेट्सचे अत्यंत महागडे "Hellige" पण उपलब्ध होते. मग मातृसंस्थेने शिकवलेला "नीर-क्षीर विवेक" वापरला.पुणे विद्यापीठातून Calibration करून आणले व "Sahli's Method" ला शुभारंभ केला.आधी स्वत:चेच हिमोग्लोबिन तपासले.चांगले भरले की !
"हिमोग्लोबिन व साखर तपासणी" हे पॅथॉलॉजी प्रॅक्टिस मधील नित्याचे "समरप्रसंग" ! त्यांना कंटाळून मी "पुढचे पाऊल" उचलले व हिमोग्लोबिन तपासणीसाठी "कलरीमेट्री"
म्हणजे "सायनमेथ" पध्दत सुरू केली.त्याही परीक्षेत मी म्हणजे "पप्पू पास हो गया" !
काळाच्या ओघात मी सगळाच हिमोग्रॅम स्वयंचलित केला. त्यामुळे तोपर्यंत चाललेली "फेकाफेकी" संपुष्टात आली. Calculated Parameters चे "अनन्य साधारण महत्व" लक्षात आले.या Electronic परीक्षणात देखील "पप्पू पास हो गया" ! मग हा पप्पू नापास झाला तरी कुठे ? वाचा.खूप महत्वाचे आहे.
काळाचा,देशाचा व प्रभुचा महिमाच अगाध ! माझी पुढची पिढी शिक्षणासाठी जगभर पांगली.चिरंजीव UK,मोठा पुतण्या Australia,तर धाकटा पुतण्या US ! Australia ने Haematology मधे खूपच मोठी प्रगती केलेली असावी. पहा ना ! आपला पुण्याचा पहिला Clinical Haematologist डाॅ.शशी आपटे हा Australia मधेच प्रशिक्षित झालेला.अशा या Australia ने या पप्पूचे डोळे खाडकन उघडले व आपण किती "क्षुद्र" आहोत याची जाणिव करून दिली.काय झाले असे ? वाचा.
मोठा पुतण्याचा Australia मधून फोन आला.काही कारणास्तव त्याचा रुटीन हिमोग्रम केला तर त्यांनी Thalassaemia Screening करायला सांगीतले.त्यात तो Carrier असल्याचे आढळले.म्हणून त्याचा फोन ! Carrier म्हणजे काय रे भाऊ ?
मी तातडीने नुसते माझेच नाही तर कुटूंबातील सर्वांचेच Thalassaemia Screening करून घेतले व घरातील नवीन Carrier शोधून काढले.
तुमचे सर्वांचे काय मत ? कटाप्पा ! पप्पू क्यू नापास हो गया ?




Comments