बसवेश्वर
- dileepbw
- Sep 14, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "वैष्णव" पंथीय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाने विवाह संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपलासा केलेला "शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाज
"शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाजाच्या "नंदीकेश्वर पुराणा" नुसार कर्नाटकातील "बागेवाडी" जिल्ह्यातील "कळदगी" या गावात एका ब्राह्मण स्त्रीच्या उदरी जन्माला आलेल्या "बसवेश्वर" यांनी "हिंदू" धर्मातील "लिंगायत" या "शैव" पंथाची स्थापना इसवी सनाच्या बाराव्या शतकात "कल्याण" या गावी केली.
"शैव" पंथाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी "बसवेश्वर" आपल्या शिष्यगणांसह "वैष्णव" पंथीय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाचे तत्कालीन वास्तव्य असलेल्या "राजस्थान" या प्रांतात गेले. तेथे सुमारे १,९६,००० लोकांनी, विशेषतः जैन धर्मियांनी "शैव" पंथाचा स्वीकार केला."लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या राजांचे राज्य असलेल्या "उज्जैन व माळवा" या प्रांतात "शैव" पंथाची धर्मपीठे स्थापन करण्यात आली.
"शैव" पंथाचा स्वीकार केलेली ही मारवाडी मंडळी महाराष्ट्रात मुख्यतः सोलापूर,पंढरपूर, मोहोळ, मलिकपेठ, माढा,बार्शी, वैराग व विशेषतः "कासेगाव" येथे स्थलांतरित झाली.पुढे ही मंडळी भृंगी,नंदी,स्कंद,वीणा व वृषभ अशा "गोत्रा" त विभागली गेली.
"शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाजात "सगोत्री" विवाह समाजमान्य असला तरी "कुलनाम" वेगळे असणे आवश्यक असते.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments