"मोढ" वाणी
- dileepbw
- Sep 13, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "मोढ" वाणी समाज
"मोढेश्वरी/मातंगी माताजी" हे कुलदैवत असलेला,"मोढेरा" गावचा,"मोढ" वाणी समाज पुढे "हिंदू" धर्मातील "वैष्णव" पंथातील वल्लभाचार्यानी स्थापन केलेल्या "पुष्टी" मार्गाकडे तर काही "मोढ" वाणी समाज बांधव "जैन" धर्मातील "नव-नाथ" पंथाकडे वळाले.
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी या "मोढ" वाणी समाजातील लोकोत्तर व्यक्तिमत्वाच्या मातोश्री "जैन धर्मगुरू बेचारजी स्वामी" यांच्या निस्सीम भक्त होत्या हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे.
"जैन" धर्माकडे आकृष्ट झालेल्या "सेठ पाजा" या "मोढ" वाणी समाज बांधवाने "वधवान' येथे ५०० हून अधिक जैन मंदिरे बांधल्याचा उल्लेख इतिहासात आढळून येतो.
तसेच प्रख्यात स्थापत्यशास्त्रज्ञ "हेमाडपंत" यांचे आध्यात्मिक गुरु "धंधुका" येथे एका "मोढ" वाणी समाज बांधवाने बांधलेल्या जैन वसाहिकेत(Monastery) कायम वास्तव्याला होते हे सुद्धा येथे लक्षात ठेवले पाहिजे.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments