लिंगायत वाणी - पंचम, दीक्षावंत, चिलवंत, टाकळकर व कानडे
- dileepbw
- Sep 14, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "वैष्णव" पंथीय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाने विवाह संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपलासा केलेला "शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाज
मुख्यतः वऱ्हाडात वास्तव्याला असलेला "शैव" पंथीय "लिंगायत वाणी" समाज "पंचम, दीक्षावंत, चिलवंत, टाकळकर व कानडे" अशा पाच उपगटात विभागलेला असून ते आपापसात तसेच अन्य "वाणी" उपजातींबरोबर "रोटी-बेटी" व्यवहार करत नसत.सध्या मात्र त्यांचे "वैष्णव" पंथीय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाशी विवाह संबंध प्रस्थापित होऊ लागले आहेत.
या पाच उपगटांपैकी "पंचम/साळी" हे पूर्वाश्रमीचे म्हणजे "लिंगायत" पंथ स्वीकारण्यापूर्वीच्या "वैदिक" धर्मातील "ब्राह्मण" समजले जातात व त्यामुळे ते आजही आठ पदरी "जानवे" घालतात व स्वतःला "एकजीत" वर्णाचे समजतात.
"दीक्षावंत" मंडळी स्वतःला "दीक्षा" घेतलेले म्हणजे "दीक्षित ब्राह्मण" समजतात.
तर "टाकळकर" मंडळी स्वतःला "टाकळी" येथील वनात साक्षात भगवान शंकरापासून उत्पन्न झालेले "लिंगायत वाणी" समजतात.
"लिंगायत वाणी" समजातील "कानडे" मंडळी म्हणजे कर्नाटकातील "लिंगायत वाणी" !
"लिंगायत वाणी" समाजातील "चिलवंत" मंडळींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना जेवताना किंवा पाणी पिताना कोणा समाजाबाहेरील व्यक्तीने पाहिले तर ते अन्न किंवा पाणी ग्रहण करीत नाहीत व संपूर्ण डोक्याचा "चमनगोटा" करतात.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments