top of page

लिंगायत वाणी - सोलापूर सखी

  • dileepbw
  • Sep 14, 2022
  • 2 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजाशी "रोटी-बेटी व्यवहारा" ने जोडल्या गेलेल्या "लिंगायत" वाणी समाजाच्या सुमारे ३००० महिलांचे संघटन बांधणार्‍या लाड सका(शाखीय) वाणी महिला सौ.गायत्री जितेंद्र सोनजे(अध्यक्षा,सोलापूर सखी आघाडी) यांनी खालील आवाहन केले आहे:-

लाड सका(शाखीय) वाणी समाजात सध्या जाणवणारी सर्वात गंभीर समस्या म्हणजे "खेड्यात व्यवसाय करणार्‍या मुलांचे तसेच तालुक्याच्या ठिकाणी व्यापारी,दुकानदारी, नोकरी असे पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या मुलांच्या लग्नाची समस्या " !

अशा मुलांचे वय वाढून जाते. घरचे सर्व चांगले असते. मुलगा पैसे पण कमवतो. तरी त्याचे लग्न होत नाही. कारण एकतर तो व्यापारी /व्यासायिक /किंवा खेड्यात राहणारा असतो.

आज काल सर्वच मुलींच्या पालकांना वाटते की आपली मुलगी चांगल्या शहरात,चांगल्या पगारावर नोकरी असणाऱ्या मुलासोबत नांदावी.ही अपेक्षा चुकीची पण नाही आणि कोणाला दोष देऊन उपयोग पण नाही.

मग खेड्यातील मुलं /व्यापारी/धंदेवाईक ह्यांनी काय करावं ?

या वर उपाय म्हणून मा.श्री.सुनीलतात्या नेरकर यांनी सोलापूर कडील आपली उपजात असलेल्या "लिंगायत वाणी" समाजाच्या मुलींशी लग्न सोहळा चालू करून रामबाण उपाय काढला. तो खूप प्रभावीपण ठरला.

मात्र या उपाया नंतर एक समस्या अशी जाणवली की लाड सका(शाखीय) वाणी हे फक्त खान्देश,बागलाण परिसरात राहणारे आहेत. त्यामुळे सोलापूर कडील मुलीचे स्थळ सुचवण्यासाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे कोणीही नसते.

म्हणून नाइलाजास्तव लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधव सोलापूरच्या एखाद्या वधू - वर मंडळाला मोठी देणगी देतात आणि अनोळखी व ते सुचवतील / सांगतील त्या मुली बघून लग्न जमवतात.यात अनेक जणांची फसवणूक पण होत असते.

जर ही फसवणूक होऊ नये आणि आपल्या मुलाचे लग्न सोलापूर कडूनच पण आपल्या ओळखीतून (एजन्ट शिवाय ) झालं असत तर किती बर झालं असत ?

आता हे शक्य आहे.आपल्या समाजात आता पर्यंत अंदाजे सोलापूर कडून ३००० पेक्ष्या जास्त मुली विवाह करून आपल्या समाजात आल्या आहेत आणि आपल्या समाजात एकरूप देखील झाल्या आहेत.

सध्या सौ.गायत्री जितेंद्र सोनजे (नाशिक) या श्री.सुनील तात्या नेरकर यांच्या मार्गदर्शनातून सोलापूर कडून आलेल्या सर्व मुलींचा "सोलापूर सखी" या नावाने ग्रुप तयार करत असून त्या मागील उद्देश असा आहे की या "सोलापूर सखीं" नीच त्यांच्या माहेरची स्थळे लाड सका(शाखीय) वाणी मुलांसाठी सुचवावी.

एजन्ट मंडळींकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी असा "सोलापूर सखीं मंच" स्थापन होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याने लाड सका(शाखीय) वाणी समाज व लिंगायत वाणी समाज यांच्यामधील संबंध अधिकच दृढ होत जाणार आहेत.

त्यामुळे सर्वांना विंनती आहे की "सोलापूर सखी" हा ग्रुप बनवण्यास मदत करा.

आपल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजात विवाह करुन आलेल्या लिंगायत वाणी समाजाच्या असलेल्या सोलापूर सखीची माहिती खालील नंबर वर अवश्य कळवा :-

9011994051/9028584803

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ८८९०)

Recent Posts

See All
माथूर/बिहारी/महावर/माहुरी वाणी

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाप्रमाणेच मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेला "माथूर/बिहारी/महावर/माहुरी" वाणी समाज लाड सका(लाड शाखीय)...

 
 
 
खाडाईत वाणी

खानदेशातील "वैष्णव" पंथीय "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजासारखाच गुजरातमधून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेला "खाडाईत वाणी" समाज खानदेशातील...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page