लज्जागौरी
- dileepbw
- Sep 7, 2022
- 2 min read
"लज्जागौरी"
माझ्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपल्याला drwani.net या संकेतस्थळावर वाचायला मिळेल. त्यामध्ये हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला आहे.
या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता,कुलाचार, कुल, कुलग्राम,कुलनाम,गोत्र,धार्मिक संकल्पना, सामाजिक चालीरिती या गोष्टींचा माझा सखोल अभ्यास चालू आहे.
त्यासाठी डॉ.रा.चिं.ढेरे यांचे साहित्य वाचणे आवश्यक आहे.डाॅ.ढेरे यांनी आपल्या संशोधनातून अनेक देवदेवतांचं "मूळ रूप" उघडे करून दाखविलेले आहे.त्याचप्रमाणे लाड सका(शाखीय) वाणी समाजातील सोळा कुलदेवतांची मूळ रूपे शोधून काढल्यास त्यांच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांच्या इतिहासावर तसेच ते "वैष्णव" पंथाकडून "शाक्त" पंथाकडे कसे वळाले यावर मोठा प्रकाश पडणार आहे.
असा अभ्यास करण्यासाठी माझ्या वाचनात आलेल्या श्री.जे.पी. सिंगदेव यांनी लिहिलेल्या "लज्जागौरी (The Nude Goddess or Shameless Woman" Orissan Examples) या लेखातील माहिती खाली प्रसृत करीत आहे.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे "सका/शक/Scythian" वंशाचे पूर्वज जसे उत्तर भारतातून दक्षिण भारतात स्थलांतरीत झाले तसा त्यांचा तेथील स्थानिक "Australoid" वंशाच्या गिरीजन, वनवासी व आदिवासी लोकांशी निकटचा संपर्क येऊ लागला.त्यांची "लज्जागौरी" ही देवता त्यांनी पार्वतीचे एक रूप म्हणून स्वीकारली.
कशी होती ही "लज्जागौरी" ?
शाकंबरी,पृथ्वी,आदिती,रेणूका,कोट्टवी,नागवा,
कबंधा अशा विविध नावांनी ओळखली जाणारी ही "लज्जागौरी" म्हणजे बाळंतीण होताना स्त्री जशी संपूर्ण नग्नावस्थेत,पाठीवर,दोन्ही मांड्या फाकवून, उताणी,पाय गुडघ्यात वाकवून व तळपाय हवेत फेकून आपल्या गुप्तांगाचे समग्र दर्शन देते तशीच, पण नवनिर्मितीचे आवाहन करणारी मातृत्वाची आस लागल्याने संभोगोत्सुक झालेली कुमारिका ! या अवस्थेत दोन्ही हातात "कमल व कमंडलू" धारण करणारी ही कुमारिका नवनार्मितीचा संदेश देते.ती बाळंतीण नव्हे !
सकृतदर्शनी "लज्जा" निर्माण करणारी असली तरी हे कलात्मरित्या मांडलेले "विश्वाच्या उत्पत्तीचे प्रतीक" म्हणजे "सृजनशक्ती" म्हणजे पार्वतीचे "गौरी" हे रुप आहे.म्हणून याचे नाव "लज्जागौरी" !
सिंधू संस्कतीमधील अनेक उत्खननात अनेक "लज्जागौरी" सापडल्या आहेत.या "लज्जागौरी" म्हणजे पुननिर्माणाचे वैश्विक प्रतीकच आहेत.अडलेल्या बाळंतिणीच्या गुप्तांगाला व स्तनांना लोणी व शिशाचे भस्म(रससिंदूर) लावण्याची प्रथा हे नवनिर्मितीचे "पूजन" च आहे.हा प्रसंग "लज्जा" निर्माण करणारा असल्यामुळे अशा अनेक मुर्ती या "चेहेरा विहीन" असतात.
डॉ.रा.चिं.ढेरे यांच्या संशोधनपर साहित्यात महाराष्ट्रातील अनेक कुलदेवता या "लज्जागौरी" स्वरूपातच आहेत असे वर्णन केलेले आहे. उत्तर भारतातून दक्षिण भारतात स्थलांतरीत झालेल्या "सका/शक/Scythian" लोकांनी "Australoid" वंशाच्या स्थानिक गिरीजन,वनवासी व आदिवासी लोकांच्या या "लज्जागौरी" ला शेंदूर फासून व मुखवटे चढवून "लज्जारक्षण" करण्याचा प्रयत्न केलेला आहे असे मत व्यक्त केले आहे.
शुध्द "शाकाहारी" असलेल्या लाड सका (शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवतांना एका बाजूला या "Australoid" वंशाच्या स्थानिक गिरीजन, वनवासी व आदिवासी लोकांकडून "मांसाहाराचा नैवेद्य" अर्पण करण्याचे कार्य का चालू असते याचे उत्तर या "लज्जागौरी"च्या रूपांतरात दडलेले आहे.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
drwani.net हे संकेतस्थळ




Comments