top of page

श्री.जोगेश्वरी देवीची आरती

  • dileepbw
  • Sep 9, 2022
  • 1 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधव श्री.प्रकाश मालपूरे सर(धुळे)

यांनी पाठवलेली सोळा कुलस्वामिनींपैकी एक "श्री.जोगेश्वरी देवी" ची आरती :-

जोगेश्वरी माता स्वयंभू मुर्ती

सकाळ संध्याकाळ करीन आरती | | धु | |

मांडळगावी तुझे ठिकाण

नदी किनारी केला मुक्काम

पांझारा नदीवर स्नानास जाती

सूर्याची किरणं झळकती वरती | | 1 | |

चैत्र अष्टमीला यात्रा तुझी भरते

दर्शनाला येती भक्त दूरदूरचे

मांडळगांवी तुझे मंदिर

सोन्याचा कळस दिसतो सुंदर | | 2 | |

साडीचोळीचा आहेर केला

गुरवाचा वाजंत्री लावली त्याला

पुरणपोळीचा नैवेद्य केला

भक्तीभावाने उभे आरतीला | | 3 | |

सदभक्त बालकं आहेत ग तुझे

अखंड नमस्कार माते ग माझे

कोटी कोटी भक्त दर्शनाला येती

गुप्त आशिर्वाद घेवून जाती | | 4 | |

दुःखी मनाचा एक भिकारी

आला ग अंबे तुझ्या दरबारी

रात्रंदिवस तुला पुकारी,

मनोकामना करी त्याची पूर्ती | | 5 | |

या आरती मध्ये उल्लेख असलेल्या "चैत्र अष्टमी" च्या महापूजेचा सदुपयोग लाड सका(शाखीय) वाणी समाज "थॅलेसेमिया" मुक्त करण्यासाठी कसा करून घेता येईल ?

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ६७७५)

Recent Posts

See All
सारजा-बारजा माता

लाड सका(शाखीय) वाणी समाजातील सोळा कुलदेवतांपैकी एक "सारजा-बारजा माता" यांची श्री.गिरीष रामचंद्र वाणी,पारोळा या समाज बांधवाने संकलित...

 
 
 
राजस्थानमधील कुलदेवता

मध्य आशियातून राजस्थान-गुजरात मार्गे महाराष्ट्रात स्थलांतरीत झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या महाराष्ट्रातील सोळा कुलदेवतांची...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page