हिंग्लज माता,बलुचिस्तान,पाकिस्तान
- dileepbw
- Sep 12, 2022
- 1 min read
"लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजाचा इतिहास"
"हिंग्लज माता, बलुचिस्तान, पाकिस्तान येथील " चिखल ओकणारा ज्वालामुखी (बाबा चंद्र्कुप)"
चैतन्यदीप मध्ये प्रकाशित झालेल्या माझ्या एका लेखात "अन्नासाठी दाही दिशा" या तत्वानुसार सर्व मानवजातीचे स्थलांतर झाले असे मी लिहिले होते. अन्नासाठी हवी सुपीक जमीन,पुरेसे पाणी व पुरेसा सूर्य प्रकाश !
सुपीक जमीन कशी बरे तयार होते ?
ज्वालामुखीचा स्फोट झाला की पृथ्वीच्या पोटातील "लाव्हा" रस उसळून बाहेर येतो. तो थंड झाला की तयार होते सुपीक जमीन !
ज्वालामुखी थंड झाला की त्यातून उसळी घेते पाणी ! ते उताराच्या दिशेने वाहू लागले की तयार होते नदी !
आता अन्नासाठी आवश्यक राहिला प्रकाश ! तो देणारा "सूर्य" म्हणूनच लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचा परम पूजनीय "नारायण" म्हणजे "विष्णू" आहे.
त्याचे "पूजक" म्हणून लाड सका(लाड शाखीय) वाणी समाज हा "वैष्णव" पंथीय समाज आहे.
अन्नासाठी आवश्यक असलेल्या या सर्व मुलभूत गोष्टी सर्व मानव समाजाला पूजनीय असल्याच पाहिजेत.
देवी पुराणात वर्णन केलेल्या ५२ शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या या हिंग्लज माता,बलुचिस्तान,पाकिस्तान येथे सुद्धा या गोष्टीची प्रचिती आल्या शिवाय राहत नाही.
तेथील सुपीक जमीन निर्माण करणारा "चिखल ओकणारा ज्वालामुखी (बाबा चंद्र्कुप)" व पाणी पुरविणारी "हिंगुला" नदी ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
एम.डी.
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments