"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग १३"
- dileepbw
- Sep 1, 2023
- 1 min read
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग १३"
©दिलीप वाणी,पुणे
"जागतिक मैत्र दिन" निमित्ताने माझ्या बालपणापासूनच्या सर्व मित्र-मैत्रिणींचा आढावा घेऊन झाला खरा ! पण त्यात "पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंट" च्या मित्रांचा उल्लेख नसल्याने मंगलने लगेच "उ.बा.ठा." गिरी करून मला "टोमणे" मारायची संधी साधली व मला विकृत(शास्त्रातील) मित्रांबद्दल २ शब्द "झटकायला" प्रवृत्त केले आहे.झटकतो ! पहा सर्वांना त्यातून "विकृत समाधान" मिळते का ते !
MD होईपर्यंत आपण "घोडनवरे" झालो आहेत याची पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा "नारायण" विजय भंगाळे याला नुसतीच जाण नव्हती तर त्याची फिकीर देखील होती.
माझी बॅचमेट मंजिरी वाकनीस MD चा नाद सोडून मातृत्वपदाला पोहोचली होती.तर श्रीमंत अडसूळने आपल्याच विद्यार्थिनीशी सूत जमवले होते.भिकन सोनावणे तर रीतसर लग्न करून कधीच संसाराला लागला होता. मीच एकटा "सडाफटिंग" राहिलो होतो.
त्यामुळे विजूने स्वत: बरोबरच माझ्यासाठी पण "वधूसंशोधन" सुरू केले होते. त्यात तो खानदेशचा ! माझा बहुसंख्य समाज तिथलाच ! मग काय ? विजूला रानच मोकळे सापडले. इकडे रायचूरसरांनी पण त्यांच्या मित्राला माझे स्थळ सुचवून ठेवलेले.मी मात्र "आधी लगीन कोंढाण्या" चे म्हणून लॅब टाकायच्या तयारीत !
तेवढ्यात विजूला माझ्याच आडनावाची एक विद्यार्थिनी सापडली व हा लागला की खणायला ! खानदेशची आहे म्हटल्यावर मला न विचारताच परस्पर तिचा शिक्षक म्हणून माझी निवड करून झाला ना मोकळा !






Comments