"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ९९"
- dileepbw
- Dec 16, 2023
- 2 min read
Updated: Dec 20, 2023
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ९९"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !
आपल्या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनात नरेंद्र पटवर्धनने १९७८ सालातल्या "डाॅन" चित्रपटातले अमिताभ बच्चन यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेले "अरे दीवानों मुझे पहचानों कहाँ से आया मैं हूँ कौन" या गीतावर नृत्य सादर केले होते.ते त्याने का निवडले असावे ? त्याने अमिताभ बच्चन यांची "केबीसी" च्या निमित्ताने भेट घेतली होती म्हणून ? का कुठल्या तरी लग्नासाठी या गाण्याची कोरिओग्रॅफी शिकला होता म्हणून ?
माझा अंदाज सांगतो.त्यासाठी मूळात "डाॅन" हे पात्र माहित असायला हवे.मग नरेंद्र पटवर्धनची सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनातील "डाॅनगिरी" सांगतो.ऐका.कोण आहे हा "डाॅन" ?
"डाॅन" हे धूर्त,कावेबाज व निष्ठूर काल्पनिक पात्र लेखक "सलीम-जावेद" यांनी १९७८ साली निर्माण केले.ते अमिताभ बच्चन(१९७८), शाहरूख खान व ह्रतिक रोषन(डाॅन २ - २००६),रणवीरसिंग(डाॅन ३ - २०११) यांनी पडद्यावर साकारलेले आहे.आधी भारतीय व नंतर जागतिक "drug market" वर नियंत्रण ठेवणार्या या "डाॅन" प्रमाणेच नरेंद्र पटवर्धनने सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनावर आपले "आर्थिक नियंत्रण" ठेवल्यामुळेच ते यशस्वीरित्या संपन्न झाले.आपल्या नंतरच्या बॅचच्या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाला "प्रथमग्रासे मक्षिकापात" झाल्याने हे प्रकर्षाने जाणवते.असो.
सध्या माझा "राग,रंग,तरंग,अंतरंग" या विषयाचा अभ्यास चालू असल्याने या गीता मागचे संगीत विज्ञान सांगतो.आधी गाणे पूर्ण ऐका !
मैं हूँ कौन-२,मैं हूँ ४,कौन डॉन-५,,मैं हूँ डॉन-२,मैं हूँ-४ डॉन
अरे तुमने जो देखा है सोचा है समझा है जाना है
वो मैं नहीं -२
लोगों की नज़रों ने मुझको यहाँ जो भी माना है,
वो मैं नहीं -२
आवारा बादलको सौदाई पागलको दुनियामें समझा है कौन
अरे दीवानों …
अरे यारों का वो यार हूँ यारी में जाँ लुटा दे जो,
मैं हूँ वही - २
दुश्मन का दुश्मन हूँ वो दुश्मन के छक्के छुड़ा दे जो
मैं हूँ वही - २
तुम जानो ना जानो मैने तो जाना है ,
महफ़िल में कैसा है कौन
अरे दीवानों …
अरे मैने क्या सोचा है क्या ख़्वाब है मेरी आँखों में
तुम जानो ना - २
मैने भी बदला है क्या रंग बातों ही बातों में
तुम जानो ना - २
चेहरे पे चेहरा है परदे पे परदा है दुनिया में समझा है कौन
अरे दीवानों …
१९७८ ची फिल्म "डॉन" मधले,कल्याणजी-आनंदजी यांनी संगीतबध्द केलेले,गीतकार "अंजान" यांचे हे किशोरकुमारने गायलेले व पडद्यावर अमिताभ बच्चनने साकारलेले हे गाणे जेव्हा स्नेहसंमेलनात नरेंद्र पटवर्धनने साकारले तेव्हा त्याला सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी किती "पापड बेलावे" लागले याची मला सातत्याने आठवण होत होती.असो.ते "म्युझिक" सर्वांना सांगण्यासारखे नाही.पण या गीतामागचे "म्युझिक" मात्र सांगतो.ऐका.
अरे दीवानो, मुझे पहचानो
RS· RSn S· R S· R S n· R
कहां से आया, मैं हूं कौन
R R· R· S G· R
मैं हूं कौन, मैं हूं कौन
S S P M~P M~G M
मैं हूं मैं हूं मैं हूं कौन?
G M~G G M~G P M N~~~G
डॉन डॉन डॉन डॉन डॉन
मैं हूं डॉन, मैं हूं डॉन
S S P M~P M~G M
मैं हूं मैं हूं मैं हूं डॉन..
G M~G G M~G P M N~~~G
तर अशी ही मला "डाॅन" सारखीच तुकड्यातुकड्यात माहित असलेली आपल्या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाची "चित्तरकथा" !
Comments