"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग १४"
- dileepbw
- Sep 1, 2023
- 1 min read
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग १४"
©दिलीप वाणी,पुणे
"जागतिक मैत्र दिन" निमित्ताने माझ्या बालपणापासूनच्या सर्व मित्र-मैत्रिणींचा आढावा घेऊन झाला खरा ! पण त्यात
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंट" च्या मित्रांचा उल्लेख नसल्याने मंगलने लगेच "उ.बा.ठा." गिरी करून मला "टोमणे" मारायची संधी साधली व मला विकृत(शास्त्रातील) मित्रांबद्दल २ शब्द "झटकायला" प्रवृत्त केले आहे.झटकतो ! पहा सर्वांना त्यातून "विकृत समाधान" मिळते का ते !
आपल्या पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण म्हणजे विजय भंगाळे हे मंगल म्हणते तसे एक "अफलातून रसायन" होतं ! HOD रायचूर सरांपासून Sweeper सेवाकर पर्यंत तो प्रत्येकाच्याच "गळ्यातील ताईत" होता.विजू हा पॅथाॅलाॅजी विभागाचा "अनभिषिक्त सम्राट" होता.कुणाचेच पान त्याच्यावाचून हलत नसे.त्याच्याइतकं जीवाच्या कराराने "लष्कराच्या भाकऱ्या" भाजणारं परत कुणी होणे शक्य नाही.हा सदैव काम करायला तत्पर ! याचा स्वभावच ज्ञानेश्वरांसारखा "चिंता करितो विश्वाची" असा ! सर्वांशी इतका समरसं होणारा व सर्वांप्रती इतका समर्पण व सेवाभाव असलेला माणूस पुन्हा होणे नाही !
त्याचं अकाली जाणं सर्वांनाच चटका लावणार ! मला भेटायला ये असा त्याचा रूबी हाॅलमधून फोन आल्याने मी तेथे गेलो.माझ्या हातात नेहेमीप्रमाणे त्याने एक भला मोठा "चार्ट" ठेवला.ते त्याचे दरवर्षी केलेले LFT Reports होते.माझी तोंडी परीक्षा सुरू झाली.विजा O negative ! त्यामुळे हा "परोपकारी गोपाळ" कधीही कोणाहीसाठी रक्तदान करायचा.त्यात एकदा Au Ag positive आला. म्हणून हा खटाटोप ! तसा जीवाला त्रास काहीच नाही.दरवर्षी Liver ची USG चालू ! एकदा शंका आली.FNAC ने HCC दाखवला.यथावकाश Lung Mets ! शेवटी रूबीमधून प्रयागला व तेथून देवाघरी प्रयाण ! शेवटी प्रधान सरांनी त्याची सेवा केल्याचे कळाले.पण काय ? ते मला नक्की माहित नाही.






Comments