top of page

"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग १८"

  • dileepbw
  • Sep 1, 2023
  • 1 min read

"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग १८"

©दिलीप वाणी,पुणे

या लेखात मी १९८२ च्या महाबळेश्वरच्या MAPCON परीषदेबद्दल माहिती सांगतो.जरूर वाचा.तिरस्थ ठिकाणी परीषद असल्याने एक आठवडाभर आधीच सर्व "बिनीचे शिलेदार" मोटारसायकलने पांचगणीला मोहिमेवर निघाले. त्यात प्रधान,गोखले,बापट हे ज्येष्ठ व भोरे,भोगे,नागधवणे, भिकन सोनावणे,मी व पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण डाॅ.विजय भंगाळे असे "बीनीचे शिलेदार" सहभागी होतो.

ही परीषद MTDC Resort मधे संपन्न होणार होती.तेथील काॅंन्फरन्स हाॅलचे रंगाचे पोपडे उडालेले होते.ते भेसूर स्वरूप तातडीने बदलणे आवश्यक होते.पण सर्व शासकीय फौजफाटा कामाला लावला व चांदबीबीने जशी किल्ल्याची भींत रातोरात बांधून काढली तद्वत हा हाॅल रातोरात रंगवून घेतला.बोहल्यावर चढण्यापूर्वी जशी नवी नवरी पार्लरमधून चेहेरा-मोहरा बदलून येते तसा हा हाॅल दिसू लागला व आमचा जीव भांड्यात पडला.


Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page