top of page

"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग १९"

  • dileepbw
  • Sep 1, 2023
  • 1 min read

"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग १९"

©दिलीप वाणी,पुणे

या लेखात मी १९८२ च्या महाबळेश्वरच्या MAPCON परीषदेबद्दल माहिती सांगतो.जरूर वाचा.तिरस्थ ठिकाणी परीषद असल्याने एक आठवडाभर आधीच सर्व "बिनीचे शिलेदार" मोटारसायकलने पांचगणीला मोहिमेवर निघाले. त्यात प्रधान,गोखले,बापट हे ज्येष्ठ व भोरे,भोगे,नागधवणे, भिकन सोनावणे,मी व पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण डाॅ.विजय भंगाळे असे "बीनीचे शिलेदार" सहभागी होतो. आठ दिवस राबराब राबून निवास,भोजन,बॅंक्वे,ध्वनीक्षेपक, दृक-श्राव्य साधने अशा एक ना भाराभार सगळ्या व्यवस्था लावून झाल्या व परीषदेच्या दिवशी टाय घालून(कारण सूट नव्हता) स्वागतकक्षात हजर झालो.

MD च्या नादात "घोडनवरा" झालेलो असल्याने माझे लक्ष साधारण "जीवन संगिनी" शोधण्याकडे होते.बी.जे.ला कुठेच लग्गा न लागल्याने मोर्चा जे.जे.कडे वळवला.एक जण आवडली. जरा कुठे संधान जुळवायला गेलो तर ती निघाली दोन पोरांची आई AP ! "जी" ला पाय लावून पळतच सुटलो.

तेवढ्यात एक Microbiologist आली.सख्खी शेजारीण ! त्यामुळे तिची बॅग घ्यायला धावलो व तिला तिच्या निवासस्थानी सोडायला गेलो.रायचूरसरांच्या करड्या नजरेतून ते काही सुटले नाही.कारण त्यांनी आधीच माझ्यासाठी त्यांच्याच एका मित्राची मुलगी शोधून ठेवली होती.हा कुठे इकडे तिकडे भटकायला नको म्हणून सरांनी मला लगेच मागे खेचले.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page