"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग २१"
- dileepbw
- Sep 1, 2023
- 1 min read
"पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण - भाग २१"
©दिलीप वाणी,पुणे
या लेखात मी १९८२ च्या महाबळेश्वरच्या MAPCON परीषदेबद्दल माहिती सांगतो.जरूर वाचा.तिरस्थ ठिकाणी परीषद असल्याने एक आठवडाभर आधीच सर्व "बिनीचे शिलेदार" मोटारसायकलने पांचगणीला मोहिमेवर निघाले. त्यात प्रधान,गोखले,बापट हे ज्येष्ठ व भोरे,भोगे,नागधवणे, भिकन सोनावणे,मी व पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा नारायण डाॅ.विजय भंगाळे असे "बीनीचे शिलेदार" सहभागी होतो.
आठ दिवस राबराब राबून निवास,भोजन,बॅंक्वे,ध्वनीक्षेपक, दृक-श्राव्य साधने अशा एक ना भाराभार सगळ्या व्यवस्था लावून झाल्या व परीषदेच्या दिवशी टाय घालून(कारण सूट नव्हता) स्वागतकक्षात हजर झालो.मला टायमधे पाहून कोल्हटकरसर एकदम हरकून गेले व माझ्यावर आपला कॅमेरा रोखून उद्गारले - Smile please ! हा माझ्यासाठी एक सुवर्णक्षणच होता.
दिवस रात्र जागल्याने व सतत आरडा ओरडा केल्याने पॅथाॅलाॅजी डिपार्टमेंटचा "नारायण" डाॅ.विजय भंगाळे याच्या आवाजाची पूर्ण वाट लागली होती.त्यामुळे सतत त्याच्या सोबत राहून मला त्याचा "आवाज" बनून रहाणे भाग पडले होते. अध्यक्ष डाॅ.आर.व्ही.आगरवालसर "लिंगमाळा" रिसाॅर्टला मुक्कामाला होते.त्यांची ने-आण करायची जबाबदारी विजाकडे होती.गाड्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणून एकदा मला त्याने "लिंगमाळा" रिसाॅर्टला नेले होते. पुण्यात आमचा "मनाली" नावाचा बारा पॅथाॅलाॅजीस्टचा गृप आहे.दरवर्षी आमची महाबळेश्वरला "वर्षा सहल" असते.प्रत्येकवेळी १९८२ च्या महाबळेश्वरच्या MAPCON परीषदेच्या स्मृती जागृत झाल्याशिवाय रहात नाहीत.






Comments