top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ६९"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ६९"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !

सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनात मद्यपानामुळे मनजीतचे "तबलावादन" मात्र होऊ शकले.तबला व डग्गा या जोडीतील डग्ग्याप्रमाणेच मनजीत देखील डोलू लागला होता व समस्त सभा देखील डोलू लागली होती.शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय मनजीतला "तबलावादन" सुरू करायचेच नव्हते.

आयुर्वेदाचा अभिप्राय असा आहे की मद्य हे अग्नि दीपक, रूचीदायक, उष्ण, तुष्टी-पुष्टी दायक, मधुर गुणांचे आहे. स्वर, आरोग्य, प्रतिभा आणि त्वचेला कांतिदायक आहे. निद्रानाश आणि अतिनिद्रा यावर उपयुक्त आहे. कृशत्व आणि स्थूलपणा दोन्ही नष्ट करणारे आहे.ते योग्य मात्रेत घेतल्यास वात कफघ्न आणि अधिक मात्रेत विषाप्रमाणे मारक आहे.नवीन मद्य त्रिदोष कारक तर जुने मद्य त्रिदोष नाशक आहे.उन्हात फिरून आल्यावर, उष्ण आहार, चर्या तसच विरेचन केलेल्यांना मद्य वर्ज्य समजावे. अति संहत, अति स्वच्छ, गढूळ, दाट मद्य पिऊ नये. भूक लागली असताना मद्य प्राशन करू नये.मद्याचा इतका सूक्ष्म अभ्यास अन्य कुठल्याही संस्कृतीत झालेला नाही.पण त्यानंतर "तबलावादन" वर्ज्य आहे असे कुठेही सांगीतलेले नाही.

शेवटी मनजीतला त्याच्या "तबलावादन" चा VDO तयार करून गटावर टाक असे सांगून त्याचा त्रस्त आत्मा शांत करावा लागला.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page