"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ३"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ३"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
"BJMC" या शब्दातील "BJ" या शब्दाचा "गर्भितार्थ" समजावून घ्यायचा असेल तर आपला वर्गमित्र व पुण्यातील सुप्रसिध्द न्युराॅलाॅजिस्ट डाॅ.नसली इच्छापूरीया याचे हे हृदयाच्या व बेंबीच्या देठापासून केलेले "आवाहन" सर्वांनी अवश्य ऐकायलाच हवे ! "A stich in time saves nine" या म्हणीप्रमाणे योग्य वेळी योग्य व्यक्तीला केलेली मदत एका संपन्न राष्ट्राच्या उभारणीसाठी कशी कारणीभूत ठरू शकते हे बैरामजी जीजीभाॅय तसेच सर डेव्हिड ससून या आपल्या आश्रयदात्यांच्या वृत्ती व कृती कडे पाहून सहजपणे लक्षात येते.हे आपल्या आधीच कसे लक्षात आले नाही ?
याचे उत्तर आपल्या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे अभिनेते व अभिजात वक्ते मा.डाॅ.मोहन आगाशे यांच्या भाषणात सापडते.ते भाषण लक्षपूर्वक ऐकल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयात आपली केवळ "बौधिक वाढ" झाली पण "भावनिक वाढ" खुंटली की काय ? असे वाटल्यावाचून रहात नाही.पुन्हा एकदा मा.डाॅ.मोहन आगाशे यांचे व्याख्यान जरूर ऐका !






Comments