top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग २१"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग २१"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनामुळे गटावरील "विळा-भोपळा" एकत्र आले.कोण हे साप-मुंगुस ? एक सातत्याने समाजवादी व साम्यवादी विचार मांडत रहाणार तर दुसरा सातत्याने भारतीय संस्कृतीचे गोडवे गात रहाणार ! एक सारखा मानवतावादाचा पुरस्कार करणार तर दुसरा वास्तवाची भीषण जाणिव करून देणार ! एकाला जातीयवाद नकोसा तर दुसरा म्हणणार जात नाही ती जात ! एक सर्वधर्मसमभाव सांगणार तर दुसरा प्रखर हिंदूत्ववादी ! या दोन "समांतर रेषा" शेवटी सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनात एकमेकांना भिडल्या ! भिडल्या कसल्या पक्या फडणीसने भिडवल्या ! ही "पंचाईत" पक्या फडणीसला का पडावी ? ओळखा पाहू कारण !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page