
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ४०"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ४०"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचे दररोज सुरु असलेले "सचित्र वृत्तांकन" पाहून ज्यांना काही कारणास्तव स्नेहसंमेलनाला येता आले नाही ते आता "हळहळ" व्यक्त करू लागले आहेत.काळजी करू नका.आपण "हीरक महोत्सव" साजरा करू या.तेव्हा तरी जरूर या.
कमजोर है वह शख्स,
जो दोस्त न बना सके
उससे भी कमजोर वह शख्स,
जो बने हुए दोस्त को गँवा दे..
या सचित्र वृत्तांकनाचे मनापासून स्वागत झाल्याचे मला तरी वाटले नाही.मंगलप्रभा,पक्या,रविंद्र अशा मोजक्या मित्रांनीच प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.वचने किम् दरिद्रता ? पक्याला तर सार्वजनिकरित्या कौतुक करण्याची "पुणेरी ॲलर्जी" आधीपासुनच होती,आहे व पुढेही रहाणार आहे.चितळ्यांच्या आंबाबर्फीला देखील "बरी आहे" व बाकरवडीला "एवढी काही वाईट नाही" अशी तोलून-मापून प्रतिक्रिया देणार्या पुणेकरांकडून अधिक अपेक्षा धरण्यात तरी काय हशील ?
पक्याची आजची "पुणेरी शालजोडी" दाखवणारी "पुणेरी पाटी" पाहून "प्रतिघात" सिनेमातला संवाद आठवला.कुठला ?






Comments