"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ४९"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ४९"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !
सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनासाठी महात्मा गांधी सभागृह निवडावे असे अनेकांचे मत होते.पण ते खूपच मोठे ! त्यामुळे उपस्थितांची संख्या कमी असेल तर ते फारच "ओके-बोके" दिसले असते.मग सिनियर बॅचेसचा(डाॅ.मंगल जाधव, डाॅ.अभिमन्यू केळकर,डाॅ.मेधा खांडेकर) सल्ला घेतला व पॅथाॅलाॅजी हाॅल मुक्रर केला.हे तर माझेच होमपीच ! त्यामुळे
पुढचे काम सोपे झाले.
मी व संजू माझ्या "होम पीच" वर गेलो.प्रा.नकाते,प्रा.कल्पना कुलकर्णी व प्रा.सुपर्णा सुवर्णकार यांना भेटलो.त्यांनी रेक्टर डाॅ.हरीश तातीया तसेच कॅंटीन मालक व लायब्ररियन यांच्याशी ओळख करून दिली.आम्ही दोघे सर्व ठिकाणी अगदी टाॅयलेट्स पर्यंत जातीने तपासणी करून आलो.डीन साहेब दौर्यावर असल्याने भेटू शकले नाहीत.पण काय योग पहा ! डाॅ.ठाकूर यांच्यानंतर डाॅ.काळे,डाॅ.प्रधान व डाॅ.शिंत्रे असे तीन डीन साहेब झाले.आपल्या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाच्या दिवशी डीन होते मा.डाॅ.शेखर प्रधान !






Comments