"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ५०"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 2 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ५०"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !
सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने "मातृऋण विमोचन" करावे ही "मुळ पारशी बावाजी संकल्पना" नसली इच्छापूरीयाची ! बैरामजी जीजीभाॅय व सर डेविड ससून या दोन परदेशी व्यापार्यांनी देणग्या दिल्या नसत्या तर आपली मातृसंस्था उभी राहिली असती का ? आपण जबाबदार डाॅक्टर्स झालो असतो का ? देशाची सेवा करू शकलो असतो का ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
या "मूळ पारशी बावाजी संकल्पने" ला मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले ते आपल्या वसतीगृहाचे पालक, मूळचे धुळ्याचे डाॅक्टर हरीश तातीया यांनी ! प्रखर सामाजिक जाणिवा असलेल्या डाॅक्टर हरीश तातीया यांनी गरजवंत विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सुलभ व्हावे यासाठी "लिनोव्हो कंपनीचे टॅबेल्ट्स" देण्यास सुचवले.
नसली इच्छापूरीयाने काही वर्गमित्रांना "BJMC-1973 Batch Scholarship" या योजनेत सहभागी करून घेतले व आठ "टॅबेल्ट्स" खरेदी करून आपल्या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात डीन साहेब व प्रमुख पाहुणे डाॅ.मोहन आगाशे यांच्या शुभहस्ते गरजवंत विद्यार्थ्यांना वितरीत केले.हे "गुप्तदान" असल्याने देणगीदार मित्रांची नावे जाहिर करण्यात आलेली नाहीत.हे विशेष ! ही भावना मन हेलावणारी ! वास्तवाचे भान ठेवून पण "बेभान" होवून काम करायला लावणारी ही "पारशी घेरचोद संकल्पना" राबवणारी आपली पहिलीच बॅच ! जय "BJMC-1973 Batch" !
नसलीने स्वत: तर हा "घेरचोदपणा" केलाच,शिवाय आपल्या मित्रांना देखील करायला लावला.त्याच्या एका जे.जे.च्या डाॅक्टर मित्राने बी.जे.च्या एका विद्यार्थ्याला "दत्तक" घेतले असून त्याच्या वार्षिक खर्चासाठी(फी,भोजन,निवास) रू.१.४ लाख पाठवून दिले आहेत.हा "घेरचोदपणा" संपूर्ण समाजात वणव्यासारखा पेटावा हीच अपेक्षा !
ही संकल्पना मिडीयाने पण उचलून धरली असून आपले गुरूवर्य डाॅ.सुभाष काळे सरांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात ऐका.
"BJMC-1973 Batch" batch has done a very generous gesture towards your alma mater as well as the present students. It is not only a promise of donation of money and giving Lenovo tablets, you actually called the students to the function and handed over the tablets.
This shows how much planning and team work has gone into the golden jubilee reunion. My compliments to you and your team.






Comments