
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ५४"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ५४"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !
आपल्या सुवर्णमहोत्सवी स्नेलसंमेलनाच्या उपस्थितीचा मंगलने घेतलेला आढावा वाचून आसारामने समाधान व्यक्त केलेले असले तरी मी असमाधानी आहे.गेली काही वर्षे मी सातत्याने गटावर वाचन,चिंतन,मनन व लेखन करून सर्व मित्रांना एकत्र ठेवण्याचा मनापासून प्रयत्न केला.त्यामुळे मला १००% उपस्थितीची अपेक्षा होती.माझ्या लेखनाचे स्नेलसंमेलनात अनेकांनी वैयक्तिकरित्या मनापासून कौतुक देखील केले.त्या सर्वांचे मनापासून आभार !
या गटामुळे सर्वांना सर्वांचे सामाजिक,राजकीय व धार्मिक विचार आता कळून चुकलेले आहेत.त्यामुळे मंगलने कितीही भरीस घातले तरी त्या विषयावर यापुढे कुणीही काहीही लिहू नये हे विनम्र आवाहन ! अगदी उदय म्हणतो त्याप्रमाणे "सौम्य" भाषेत सुध्दा नको.ज्यांना असे काही लिहिल्यावाचून रहावत नाही त्यांनी यासाठी तयार केलेल्या वेगळ्या गटावर अवश्य लिहावे.पण या मुख्य गटावर नको.त्यामुळे काही जण विनाकारण दुखावले जातात,हे विसरून चालणार नाही.या उप्पर कुणी लिहिल्यास त्याकडे झाडून सर्वांनी दुर्लक्ष करावे.ही विनंती.






Comments