top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ६२"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ६२"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !

सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यक्रम देखील नीट नेटका झाला. "BJMC-1973 Batch" चा अमेरिकेत स्थायिक झालेला न्युराॅलाॅजिस्ट "स्टार स्टुडंट" डाॅ.राजीव मोतीवाला याने MBBS च्या पहिल्या वर्षापासून ते थेट शेवटच्या वर्षापर्यंत शिक्षण देणार्‍या सर्व प्राध्यापकांचा मनापासून "ऋणनिर्देश" केला.

त्यानंतर "BJMC-1973 Batch" चा पुण्यातील सह्याद्री रूग्णालयाचा न्युराॅलाॅजिस्ट डाॅ.नसली इच्छापूरीया यांनी

"BJMC-1973 Batch Scholarship" ची संकल्पना सांगून सर्वांना निधी देण्याचे आवाहन केले.त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला व रू.बारा लाख निधी संकलित झाला. त्यातून बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातील आठ गरजवंत विद्यार्थ्यांना "लिनोव्हो टॅब्लेट" चे वितरण करण्यात आले.हा उपक्रम दरवर्षी राबवला जाणार आहे,हे विशेष !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page