"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ५३"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
Updated: Dec 3, 2023
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ५३"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !
सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन फक्त अपर डेक,लोणावळा पुरतेच मर्यादीत ठेवले असते तर ? ती एक "फन फेअर" किंवा नुसतीच "पंचतारांकित सहल" झाली असती.पण त्याला काॅलेजचा कार्यक्रम जोडला आणि सगळा नूरच पालटला.आपली "मातृसंस्था" सुखावली.जनतेला पण अप्रूप वाटले.मिडीयाला दखल घ्यावी लागली.गरजवंत विद्यार्थ्यांची गरज भागली.एक चांगला पायंडा पडला.काल दीड लाखाची देणगी दिलेल्या जे.जे.च्या डाॅक्टरच्या पत्नीने आज तिच्या कमाईतून दीड लाखाची अजून एक देणगी दिलेली आहे.हे सांगायला आनंद होत आहे.मजेबरोबरच सामाजिक जाणिवा देखील जागृत झाल्या,हेच आपल्या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य आहे.
अपर डेक,लोणावळा येथे केलेल्या "मौज-मजे" चे वर्णन सुभाषने अतिशय चांगल्या शब्दात व्यक्त केलेले आहे. वाचा.
खूप मौज, गाणी, नाच,
जुनी मैत्री, नव्याने दृढ झाली.
फक्त आणि फक्त आनंदच देत राहीली.
हे आयोजन,
योजकः तत्र दुर्लभः,
मात्र हे योजक आमच्या बॅचचे वैशिष्ट्य.
भल्या पहाटे,
upper deck का म्हणतात हे अनुभवले.
मंतरलेली सकाळ.
नंतर न्याहरी.
यथेच्छ.
सकाळी ९.३०ला निघण्याचे ठरले आणि सगळे तासभर आधिच तयार.
पुन्हा मैत्र जुळले.
गप्पा रंगल्या.
आता वेध मातृसंस्थेला भेटण्याचे.
काही मित्र आणि मैत्रिणींच्या तेथेच भेटी.
नसली, संजीव, नरेंद्र, आरती,विनायक, आसाराम, अविनाश आणि दिलीप सह आम्ही बै.जी.साठी आग्रही !
किती बैठका,
किती चर्चा.
मात्र हा मोठा emotional सोहळा.
वाटेत अविनाश आणि संजीव सतत बै.जी.च्या व्यवस्थेचा आढावा घेत होते.
एकच ध्यास,
बेभान होवून अमलात आणीत होते.
कार्यक्रम पत्रिका बदलली.
डीन ना लवकर दुसरी कडे जायचे.
सारं बदलून सुरळीत.
संजूचे सूत्रसंचालन रेखीव.
पोहचताच मित्र आणि मैत्रिणींच्या घोळक्यात सारे रमले.
तेथेही चहापान.
UG त पुन्हा रमलो
मात्र यावेळी "बाके बडविणे" विसरलो !
תגובות