"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ६८"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ६८"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !
हे "सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन" अपर डेक रिसाॅर्ट, लोणावळाच्या "मद्यसंस्कृती" मुळे रसिकांच्या चांगलेच स्मरणात राहिल.अरसिक महिलांचा "रोष" नको म्हणून रसिक पुरूषांकडून मद्यासाठी वेगळी "वर्गणी" काढली होती. तर महिलांनी घरून "वाईन" आणून त्याचे "उट्टे" काढले. त्यांच्यामते जे काही पुरूष पीत होते ती "दारू" ! पण "वाईन" नावाच्या मद्याला कधी "निंदा नालस्ती" सोसावी लागत नाही.
त्यामुळे त्यांनी जगातील सर्वात उत्तम प्रतीची "वाईन" घरूनच आणली होती व पुरूषांना "टुकटुक" करीत त्याचा मनमुराद आस्वाद घेणे चालू होते.
पुरूषांचे मात्र तसे नव्हते."मद आणणारे ते मद्य" असा "जनरल रूल ऑफ थंब" लावून समोर तसेच शेजारी बसलेल्या मित्राच्या ग्लासमधे जे आहे ते आपलेच आहे असा
सर्वसमावेश भाव निदान माझ्या तरी मनी होता हे मन्याने ओळखलेच असावे.
कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी दुर्योधनाने आधी मद्य निर्मिती सुरू करण्याची आज्ञा दिलेली मला माहित होती.त्यामुळे योद्धे वीरश्रीने लढत असत.त्याच वीरश्रीने मी माझ्या वैचारिक विरोधिकेवर तुटून पडलो.पण ती सुध्दा काही "कच्च्या गुरूची चेली" नव्हती.हातातली "रेड वाईन" उंचावत ती सुध्दा माझ्यावर तुटून पडली.आमच्या या लढाईचे महायुध्दात रूपांतर व्हायच्या आत श्रीकृष्णाने मला लांबच्या रस्त्याने तेथून बाहेर काढले व गुपचूप शेकोटीकडे(बाॅन फायर) वळविले.
महाभारतात मद्याचे अनेक औषधी उपयोग सांगीतलेले आहेत.मद्यपान हे श्रम परिहार म्हणून करणही संमत होतं. महाभारत हा ग्रंथ तत्कालीन समजुती,चालीरीती याबद्दल जास्त माहिती देतो.त्यानुसार मद्यपान निंदनीय नव्हतं. सहकुटुंब,मित्र आणि त्याचा परिवार यांच्या सोबतही मद्यपान,भोजन होत असे.त्याला अनुसरून मग मी भोजनगृहाकडे प्रयाण केले व डेझर्टचा आस्वाद घेतला.






Comments