top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग १७"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग १७"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनात "धन्य ते गायनी कळा" प्रदर्शित करणार्‍या सर्वांचेच सर्वांच्यातर्फे मनापासून आभार ! माझ्यातर्फे शीला गोळे,जयंत सरवटे व अंजली मंगरूळकर यांचे विशेष आभार ! त्यांनी गायलेली सर्वच गाणी मला अगदी मनापासून आवडली.

दुर्दैवाने देवाने "आवाज" वाटला तेव्हा मी नुकताच भोजनाला बसलो होतो.भोजन काही हातचे सुटेना ! त्यामुळे मला "गायकीचा आवाज" मिळालाच नाही.माझे भोजन आटोपेपर्यंत "गायनाचे रसग्रहण" कसे करायचे एवढाच भाग शिल्लक होता.तेवढे तर तेवढे ! त्याचा उपयोग करून भविष्यात "रंग,तरंग व अंतरंग" नावाचा एक ग्रंथ लिहिण्याचा मानस आहे.आपल्या हीरकमहोत्सवी स्नेहसंमेलनापर्यंत लिहून व्हावा अशी अपेक्षा आहे.पाहू या कसे जमते ते !

अंजली मंगरूळकरने(दीप्ती वैद्य) सादर केलेल्या "राग यमन" चे त्यात तिने गुंफलेल्या काही गाण्यांचे रसग्रहण यथावकाश करेनच.अंजली मंगरूळकरने(दीप्ती वैद्य) छेडलेला "राग यमन" अडखळत का होईना पण माधुरी पेटकरने बरोबर ओळखला होता.माझा नुकताच अभ्यास झालेला असल्याने मला खात्री होती म्हणून मी पटकन उत्तर दिले व कधी नव्हे ती नरेंद्र पटवर्धनची "वाहवा" मिळवली.

ऐनवेळी "तबलावादन" करता न आलेल्या "कर्णाचा अवतार" झालेल्या संगीतप्रेमी मनजीतसिंगने नंतर अजून दोन पेग लावले व मला "राग यमन" मधील "मेरे हमदम मेरे दोस्त" या चित्रपटातील "छलकाए जाम,आईए आप की आँखों के नाम"

हे गाणे ऐकवले.माझी अवस्था साधारण तशीच असल्याने मी पण त्याला साथ दिली.अशी ही सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाची रंगतदार मजा !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page