top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग १९"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 5 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग १९"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

माझ्या मते सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनात सर्वात उत्तम गाणी कुणी म्हटली असतील तर ती नेहेमीप्रमाणे शीला गोळे(शिंत्रे) यांनी !

मला सर्वात जास्त आवडले ते "लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो" ! तशी सगळीच गाणी शीलाने अतिशय उत्तम सादर केली.पण हे गाणे मूळातच मला आवडते ते अनेक कारणांनी.आज सांगतो त्याबद्दल !

स्वातंत्र्यपूर्व भारतातील खरेखुरे "राजे" असलेल्या पित्याच्या पोटी जन्माला आलेले "राजा मेहदी अली खान" या गीतकाराचे संगीतकार मदन मोहन यांनी संगीतबध्द केलेले व स्वर्गीय आवाजाची देणगी प्राप्त झालेल्या लता मंगेशकर यांनी गायलेले अजरामर गीत म्हणजे "लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो" ! "वह कौन थी" या चित्रपटात साधना व मनोजकुमार यांनी तेवढ्याच ताकतीने सादर केलेले हे गीत !

"लग जा गले कल फिर रात हो ना हो" या गाण्याची पार्श्वभूमी आधी सांगतो.हे गीत आपल्या पत्नीचं प्राणघातक आजारपण कळल्यानंतर राजा मेहदी अली खान यांनी प्रसवलं ! त्यामुळे या गीतात त्यांच्या पत्नीप्रेमाला "शोकमग्नते" ची झालर आहे. आश्चर्याची गोष्ट अशी होती की त्यांची पत्नी "ताहिरा" यांना कोणताच आजार नव्हता,त्या बऱ्याच वर्ष जगल्या.राजासाहबचं आपल्या पत्नीवरचं प्रेम आणि तिने त्यांना दिलेला प्रतिसाद हा त्यांच्या अनेक प्रेमगीताचा आत्मा होता.परत एकदा ऐका हे गाणे इंग्रजी भाषांतरासह !

"लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो"

hug me so that this beautiful night does not happen again

लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो

May not meet again in this life

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

hug me so that this beautiful night does not happen again

लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो

May not meet again in this life

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

hug me

लग जा गले से

Today we have got these watches by luck

हमको मिली हैं आज, ये घड़ियाँ नसीब से

take a close look at us

जी भर के देख लीजिये हमको क़रीब से

Then this thing may or may not happen in your destiny.

फिर आपके नसीब में ये बात हो न हो

May not meet again in this life

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

hug me

लग जा गले से

Come closer that we will not come again and again

पास आइये कि हम नहीं आएंगे बार-बार

Let's cry with our arms around our neck

बाहें गले में डाल के हम रो लें ज़ार-ज़ार

This love should not rain again from the eyes

आँखों से फिर ये प्यार कि बरसात हो न हो

May not meet again in this life

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

Hug me so that this happy night may not happen again

लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो

May not meet again in this life

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

hug me

लग जा गले से

शीलाने गायलेल्या या गाण्याचे "रसग्रहण" करतो. दि.७ फेब्रुवारी १९६४ ला "वो कोन थी" रिलीज झाला आणि अडीच वर्षांतच २९ जुलै १९६६ रोजी या चित्रपटाचे गीतकार राजा मेहंदी अली खान यांचं निधन झालं. 'वो कौन थी' साठी दिलेलं 'लग जा गले..' हे अप्रतिम गाणं दिग्दर्शक राज खोसला यांनी आधी रिजेक्ट केलं होतं. हे गाणं नाकारल्याचं राजाजींना विलक्षण दुःख झालं, त्यांनी आपल्या भावना संगीतकार मदन मोहन यांच्या कानावर घातल्या. इतकं चांगलं अर्थपूर्ण गाणं नाकारल्यामुळे मदनजींनाही वाईट वाटलं. त्यांनी चित्रपटाचा नायक असलेल्या मनोजकुमारना बोलवून घेतलं आणि त्यांच्याकडे निरोप दिला की एकदा राज खोसलांनी पुन्हा एकदा गाणं ऐकावं अशी विनंती केली जावी. दुसऱ्यांदा गाणं ऐकताच राज खोसला दिग्मूढ झाले. गाणं आधी रिजेक्ट केल्याचा त्यांना खेद झाला. सिनेमा सुपरहिट झाला.

या चित्रपटानंतर "हॉरर प्लस रोमान्स" चा नवा ट्रेंड आला. या चित्रपटातली गाणीही हिट झाली तरी राजा मेहंदी अली खान मात्र आपल्या दुःखात बुडाले होते. जीव लावून लिहिलेली गाणी लोक डोक्यावर घेताहेत पण आपल्या भावनांचं काय हा प्रश्न त्यांना सतावत असावा. 'लग जा गले...' ची दास्तान शोकात्मकतेकडे झुकणारी आहे.

आपण एखादं गाणं गुणगुणत असतो. त्यातला अर्थ भावला, ती रचना आवडली, त्यातली धून पसंत पडली तर ते गाणं आपल्याला मनापासून आवडतं. ते गाणं कुठं तरी आपल्या काळजाला स्पर्श करत असलं तर मग बाकीच्या गोष्टींची नोंद अनाठायी ठरते. ही गाणी आपल्या मनात कोरली जातात, त्यांना अढळस्थान असते. असंच फिलिंग 'लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो' या अवीट गोडीच्या देखण्या गीताबाबतीत आहे.या गाण्याची पार्श्वभूमी दुःखद आहे.

गीतकार राजा मेहंदी अली खान यांची रोमँटिक गीतं "हॉन्टेड कॅटेगरी" मधली वाटावीत इतकी "गूढते" कडे झुकणारी आहेत. फक्त ३८ वर्षे जगलेल्या या माणसानं खंडीभर गाणी लिहिली नाहीत.पण जी लिहिली ती अजरामर होतील अशीच लिहिली.यातली काही गाणी वानगीदाखल देता येतील - अगर मुझ से मुहब्बत हैं, आप की नजरोने समझा प्यार के काबिल मुझे, मेरा सुंदर सपना बीत गया, तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा, तेरे बीन सावन कैसे बिता, आप युंही अगर हमसे मिलते रहे, नयना बरसे रिमझिम, आखरी गीत मोहब्बत का, आप के पहलू में आकर रो दिये, तुम बिन जीवन कैसे बिता पुछो मेरे दिल से... ही सगळी गाणी एका "जोडप्याच्या संवादा" ची गाणी आहेत हे आधी खरं वाटणार नाही.पण वास्तव तसंच होतं.

"ताहिरा" हे राजा मेहंदी अली खान यांच्या पत्नीचं नाव.हे दोघंही उच्चशिक्षित घरातले होते. फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये न जाता ते भारतातच राहिले.ताहिरास मुलबाळ झालं नाही,याचं राजासाहबला दुःख नव्हतं.पण ताहिरा यामुळं दुःखी असायच्या.तर राजासाहब याचं जिक्र कधी करत नसत,आपल्या देखण्या बायकोवर त्यांचं अमीट प्रेम होतं.अगदी तिच्या श्वासावर त्यांचा श्वास चाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

ताहिरांनी अपत्यप्राप्तीसाठी उपचार आणि चाचण्या सुरु केल्या,पण त्या दरम्यान एका परिचित डॉक्टरांनी त्यांना सावध केलं की त्यांना कर्करोग असू शकतो.या बातमीनं ताहिरा डगमगल्या नाहीत पण राजा मेहंदी अली खान मात्र पुरते कोसळले.या काळात ते शोकमग्न होते पण ताहिराला तसं त्यांनी कधी दाखवलं नाही. मात्र त्यांच्या गीतातून तो "दर्द" झळकत राहिला. इथे साहीर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांच्या प्रेमबंधाचं गीतातलं प्रकटन नकळत आठवतं.

प्राणाहून प्रिय असलेल्या आपल्या पत्नीचा विरह होणार ही कल्पनाच त्यांना सहन झाली नाही. आणि या दरम्यानच ते आजारी पडले. त्यांनी हाय खाल्ली. अवघ्या काही वर्षात त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या काही निकटच्या स्नेह्यांच्या मते त्यांनी इस्पितळातच आत्महत्या केली, पण याला कधीही दुजोरा मिळू शकला नाही. त्यांच्या

स्वातंत्र्यपूर्व भारतातील खरेखुरे राजे असलेल्या पित्याच्या पोटी जन्माला आलेल्या राजा मेहंदी अली खानचे वय चार वर्षाचं असतानाच त्यांचे वडील निवर्तले होते. आई आणि मामूने सांभाळ केलेल्या राजासाहबच्या काव्यात "अति संवेदनशीलता" आधी विधवा आईच्या स्नेहार्द्र प्रेमातून द्रवली होती आणि ताहिराशी संपर्क झाल्यावर तिच्याबद्दलच्या भावना शब्दबद्ध झाल्या.राजासाहबचा स्वभाव अधिक हळवा होण्याचं आणखी एक कारण होतं ते म्हणजे बॉलीवूडशी जोडले जाण्याआधी त्यांची भेट "सा आदत मंटों" यांच्याशी झाली होती ज्यांनी त्यांना अशोककुमारशी भेट घालून दिली होती. राजासाहब मंटोला कधीच विसरू शकले नाहीत, त्यामुळे जीवनाकडे बघण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनात कमालीचं "स्त्रीविषयक हळुवार प्रेम" झळकतं.

आपली पत्नी आपल्याला सोडून जाणार, न जाणो उद्याची रात्र असेल नसेल आपण आज तिची गळाभेट घेतलीच पाहिजे या नितळ भावना त्यांच्या लेखणीतून साकार होण्याची पार्श्वभूमी ही अशी आहे. 'लग जा गले...' चा इतिहास असा दुःखदायक आहे. लग जा गले ऐकायला आवडतं, पण पाहायला आवडत नाही. पौर्णिमेचा चंद्र ढगाळ वातावरणात झाडांच्या फांद्याआडून डोकावतोय आणि शुभ्र चमकत्या मोत्यांच्या सरी ल्यालेली "काळ्या साडीतली देखणी साधना" गूढ सूरांत त्याला साद देतीय.तो खेचल्यागत तिच्या मागे मागे येतोय. सगळा भवताल भारून गेलेला आहे. हातून काहीतरी निसटतंय, काहीतरी चुकतंय असे भाव त्याच्या ठायी आहेत. हा रोमान्स एक लयीतला कधीच वाटत नाही. यात काहीतरी आर्त आहे हे गाणं पाहताना आणि ऐकताना लगेच जाणवतं. हे जे काही टोकरणारं आहे ते राजा मेहंदी अली खानचं "अंतर्मन" आहे जे आपल्या काळजाचा ठाव घेतं. आपण नकळत त्याच्याशी कानेक्ट होतो. प्रेमाचं हे असंच असतं.

शीलाने गायलेल्या या गाण्याची पार्श्वभूमी कळल्यापासून साधना आणि मनोजकुमारच्या यांच्या जागी रुबाबदार राजाजी आणि देखण्या ताहिराच मला दिसू लागलेल्या आहेत.हे सर्व खरं असलं तरी याच चित्रपटातल्या दुसऱ्या एका गीतानं मनाला आणखी एक डंख होतो. तो कमालीचा विस्मयकारक आहे. आपल्या पत्नीच्या विरहानं घायळ झालेल्या राजाजींना ताहिरानेही काही तरी सुनावलं असेल नाही का ? मग तिने जे सुनवले ते ही त्यांनी शब्दबद्ध केले असेल का याचे उत्तर माझ्याकडेही नाही. पण राहून राहून तसेच वाटते कारण त्या गीताचे बोल असेच पोखरून काढणारे होते. राजाजींनी 'वो कौन थी' च्या त्या गीतात ताहिराजींपासून अश्रू लपवत काळीज ओतून लिहिलं असेल असं मला वाटतं. कारण त्या गीताचे बोल होते, "जो हमने दास्तान अपनी सुनाई आप क्यों रोये ?" तुम्हाला काय वाटते ताहीरांनीच हा प्रश्न राजाजींना केला असेल की नाही ? प्रेम हे असं असतं.जो ते अनुभवतो तो त्यावरच जगतो आणि त्यावरच मरतो !

Σχόλια

Βαθμολογήθηκε με 0 από 5 αστέρια.
Δεν υπάρχουν ακόμη βαθμολογίες

Προσθέστε μια βαθμολογία
bottom of page